Income Tax Raid Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ED नंतर आयकराची दहशत, 2 ठिकाणी छापे टाकून 390 कोटींची रोख रक्कम जप्त

या छाप्यात आयकर विभागाने 58 कोटी रुपये रोख आणि 32 किलो सोने जप्त केले आहे. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 13 तास लागले.

दैनिक गोमन्तक

Income Tax Raid: ED नंतर आता आयकर विभागही कारवाईच्या तयारीला लागला आहे. प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील जालना आणि औरंगाबाद येथे छापे टाकले. औरंगाबादमधील एका बिल्डरवर आणि जालन्यातील स्टील कंपनीच्या मालकाच्या सपंत्तीवर हे छापे टाकण्यात आले. या छाप्यात आयकर विभागाने 58 कोटी रुपये रोख आणि 32 किलो सोने जप्त केले आहे. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 13 तास लागले.

या कंपन्यांच्या मालकांवर 3 ऑगस्ट रोजी छापे टाकण्यात आले होते. आयकर विभागाने एसआरजे पीटी स्टील्स प्रा. लि. आणि कालिका स्टील अलॉयज प्रा. लिमिटेड कंपन्यांवर छापे टाकले. या छाप्यात आयकर विभागाला 390 कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती मिळाली, जी जप्त करण्यात आली होती. या दरम्यान विभागाचे 260 अधिकारी ही कारवाई करत होते.

छाप्यादरम्यान ही कारवाई पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली होती. याबाबत अधिकृत माहिती कोणालाही देण्यात आलेली नाही. ही कारवाई 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान झाली. आयकर विभागाच्या नाशिक पथकाने ही कारवाई केली आहे. आयकर विभागाचे 260 कर्मचारी, 120 वाहने आणि 5 पथकांनी हा छापा टाकला आहे.

रोख मोजण्यासाठी 13 तास

या छाप्यात सापडलेली रोकड जालना स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता रोख मोजणी सुरू झाली ती दुपारी 1 वाजेपर्यंत चालली. जालन्यातील 4 स्टील कंपन्यांच्या वर्तनात अनियमितता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. यानंतर विभागाने कारवाई करत छापा टाकला. या छाप्यात घरामध्ये काहीही सापडले नाही, मात्र शहराबाहेरील एका फार्महाऊसमधून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT