How did the accused woman in the road accident become a man? Bombay High Court asked the police. Dainik Gomantak
महाराष्ट्र

"ते आम्ही स्वीकारणार नाही, रस्ते अपघातातील आरोपी महिला पुरुष कशी झाली?" हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

"शिंदे आणि तपास अधिकारी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी लांडगे यांच्यावर एकतर दबाव आणला, धमकावले किंवा तडजोड करण्यास त्यांना भाग पाडले, असे प्रथमदर्शनी दिसते. ते आम्ही खपवून घेणार नाही.”

Ashutosh Masgaunde

How did the accused woman in the road accident become a man? Bombay High Court asked the police:

मुंबई उच्च न्यायालयाने सह पोलीस आयुक्त, ठाणे आणि पोलीस उपायुक्त (झोन 3), कल्याण यांना नोटीस बजावली आ हे. ज्यात न्यायालयाचा अवमान करण्यासह कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा केली आहे.

संबंधीत खटल्यात रस्ते अपघातातील आरोपी महिला पुरुष कशी झाली याची चौकशी करण्याचे आणि स्पष्टीकरण देण्याचे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले.

संबंधीत गुन्ह्यात आरोपीची चुकीची ओळख आणि गुन्हेगारी न्यायशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांबद्दल उच्च पोलिस अधिकारी गांभीर्याने दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. कथित आरोपी, एक स्त्री होती नंतर ती पुरुष कशी झाली याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेले नाही. तपास अधिकाऱ्यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी एकतर दबाव आणला, धमकावले किंवा तडजोड करण्यास भाग पाडले असे प्रथमदर्शनी दिसते. जे आम्ही स्वीकारणार नाही.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि श्याम चांडक

पुण्याचा रहिवासी असलेल्या निखिल शिंदे (३३) यांनी रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

7 जानेवारी 2023 रोजी शिंदे यांना महात्मा फुले पोलिस ठाण्यातील एका हवालदाराचा फोन आला. त्यांनी शिंदे यांच्याकडे मारुती स्विफ्ट कार आहे का? याची चौकशी केली.

जेव्हा शिंदे यांनी “होय” असे उत्तर दिले तेव्हा त्यांना विचारले गेले की, कारचा अपघात झाला होता का? आणि त्यातून एक महिला खाली उतरली होती का? त्यावर शिंदे यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.

मात्र, कल्याणचे रहिवासी अविनाश लांडगे (३६) ज्यांचा अपघात होऊन हात फ्रॅक्चर झाला होता, त्यांनी या अपघातानंतर गाडीतून महिला उतरल्याचे सांगितले.

7 जानेवारी 2023 रोजी शिंदे यांना सांगण्यात आले की, लांडगे यांच्या वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, 2 जानेवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास विलेपार्ले रोडवर लांडगे यांना कारने धडक दिली आणि ते पडले.

त्यानंतर एका महिला चालकाने खाली उतरून विचारले, " तुला दिसत नाही का?" नंतर ती तिच्या गाडीत बसली आणि तिथून निघून गेली.

शिंदे यांचे वकील आय के त्रिपाठी आणि अतुल रेडकर म्हणाले की एफआयआर “अज्ञात महिला ड्रायव्हर आणि स्विफ्ट डिझायरविरुद्ध आहे” आणि गाडीचा क्रमांक वेगळा आहे.

युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश म्हणाले की, "19 ऑक्टोबरच्या आदेशात "विशिष्टपणे" JCP ला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. पोलीस उपायुक्तांनी कथित आरोपी असलेली स्त्री पुरुष कशी झाली याचे स्पष्टीकरण दिलेले नाही."

या प्रकरणाच्या चौकशीबद्दल न्यायाधीश असमाधानी होते. कारण ते एफआयआरमध्ये नमूद केलेल्या तथ्यांच्या विरुद्ध होते.

दोन्ही न्यायाधीश पुढे म्हणाले, शिंदे आणि तपास अधिकारी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी लांडगे यांच्यावर एकतर दबाव आणला, धमकावले किंवा तडजोड करण्यास त्यांना भाग पाडले, असे प्रथमदर्शनी दिसते. ते आम्ही स्वीकारणार नाही.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT