Maharashtra News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: मुस्लिम तरुणीशी प्रेमविवाह, हिंदू तरुणाची हत्या, गोदावरीत फेकला मृतदेह

प्रेमविवाह केल्याप्रकरणी तरुणाची हत्या, पोलिसांनी केली 7 आरोपींना अटक

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील अहमदनगरमधील श्रीरामपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे महिनाभरापूर्वी मुस्लिम तरुणीसोबत प्रेमविवाह केलेल्या दीपक बर्डे नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दीपकचे आधी अपहरण करून नंतर खून करून मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांचा तपास सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू आदिवासी मुलाचे आधी अपहरण करण्यात आले आणि नंतर त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला. पोलीस नदीत मृतदेहाचा शोध घेत आहेत. 

महाराष्ट्रात (Maharashtra) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी जाहीर निषेध केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला होता. दिपक बर्डे हा मृत युवक गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असून याबाबत एकलव्य आदिवासी समाजाने अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर दोन वेळा मोर्चाही काढला होता. 

नुकतेच भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर 'लव्ह जिहाद'ची प्रकरणे घडत असल्याचा आरोप केला होता. बोंडे म्हणाले होते की, अमरावतीमध्ये आतापर्यंत लव्ह जिहादच्या 20 घटना घडल्या असून, त्यापैकी अनेक मुलींचा लग्नानंतर ठावठिकाणा लागला नाही. अमरावतीच्या (Amravati) धारणी येथील एका मुस्लिम तरुणाने हिंदू मुलीशी लग्न केल्याचे त्यांनी ट्विट केले होते. या घटनेचा संदर्भ देत बोंडे म्हणाले की, 'लव्ह जिहाद'च्या घटना अमरावती जिल्ह्यात अधिक घडत आहेत.

बोंडे म्हणाले होते की, लग्नानंतर आजपर्यंत अनेक प्रकरणांमध्ये मुलीचा शोध लागला नाही. त्याने सांगितले की, यापूर्वीही त्याने एका मुलीसोबत लग्न केले होते, तिचा पत्ता अद्याप पोलिसांना लागलेला नाही. मुलींना फूस लावून लग्न केले जाते. त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. मुस्लिम समाजातील लोकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे, असे भाजप खासदार म्हणाले होते. मुस्लीम समाजातील मुलांनी हिंदूंच्या मुलींशी दिशाभूल करून लग्न करत राहिल्यास त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT