राज्यात 22 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) हाय अलर्ट देण्यात आला आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता, 22 जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'

बंगालच्या उपसागरात आणि आरबी समुद्रात (Arabian Sea) तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीचा मॉन्सून (Monsoon) महाराष्ट्र आणि ईशान्येतील काही भागात अजूनही थांबला असल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रातमुळे राज्यातील अनेक भागात जारदार पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे केरळात मुसळधार पाऊसाने हाहा:कार माजला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रावर (Maharashtra) देखील होणार आहे. राज्यात 22 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) हाय अलर्ट देण्यात आला आहे.

यामध्ये नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, बीड, जालना, बुलडाणा, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली येथे मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल विदर्भातील अनेक भागांत पावसाने झोडपले तर अकोल्यात अतिवृष्टी झाली.

खरे तर मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाकडू देखील सांगण्यात आले होते. साधारणत: तो 17 ऑक्टोबरपर्यंत एग्झिट घेतो. त्याच्या परतीचा प्रवास हा 6 ऑक्टोबरपासूनच सुरुवात झाली, मात्र बंगालच्या उपसागरात आणि आरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीचा मॉन्सून महाराष्ट्र आणि ईशान्येतील काही भागात अजूनही थांबला असल्याचे दिसत आहे. तर राज्याच्या इतर भागात तापमानात घट झाली असून हवेत गारवा वाढला असून येथे थंडीची चाहूल लागलेली दिसत आहे. महाबळेश्वरमध्ये तापमानात 15.8 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. तर सातारा (18.7), सोलापूर (18.6) पुणे (18.4) इतकी नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT