Crime News in Maharashtra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

नातवाच्या पसंतीला आजीने दिला नकार म्हणून काढला आजीचाच काटा

आजी वारंवार मुलींना नकार देत असल्याने संतापलेल्या नातवाने आजीला काठीने बेदम मारहाण केली

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये एका 25 वर्षीय मुलाने आपल्या आजीची हत्या केली. आजीने नातवाला लग्नासाठी कर्नाटकाहून सोलापूरला बोलावले होते. मुलाच्या आजीने वारंवार मुलींची स्थळे नाकारल्याने नातवाने आजीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Maharashtra Crime)

आरोपीने पोलिसांसमोर दिली गुन्ह्याची कबुली

घटना सोलापूरच्या जोडभावी पेठेतील आदर्श सोसायटीची आहे. नातवाला लवकरात लवकर लग्न करायचे होते, पण त्याची आजी आलेल्या मुलींची स्थळे वारंवार नाकारत होती.आणि यामुळे मुलाच्या लग्नाच्या मार्गात अडथळा ठरत होती, म्हणून त्याने आजीला आपल्या मार्गातूनच दूर केले. ही घटना ज्याने ऐकली तो थक्कच झाला आहे. या घटनेनंतर 25 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली.आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याच्यावर त्वरीत FIR दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यास सुरवात केली.

नातवाच्या पसंतीला आजीचा नकार

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आदर्श नगरमध्ये राहणारी मृत मलनबी हसन नदाफ हिने तिचा नातू सलीम नदाफला कर्नाटकातून लग्नासाठी घरी बोलावले होते. नदाफसाठी आलेल्या नात्यांपैकी नदाफला काही मुलीही आवडल्या होत्या, पण आजीने ती सर्व नाती नाकारली. सलीमला वाटले की त्याची आजी त्याला लग्न करू देणार नाही. त्यामुळे संतापलेल्या नदाफने सोमवारी आजीला गाठले आणि तिच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. प्रकरण इतके वाढले की त्याने आजीवर काठीने हल्ला केला. तो मरेपर्यंत आजीला मारत राहिला. मला कर्नाटकातून इथे का बोलावलंय? तू माझ लग्न का करून देत नाही, असे म्हणत तो आपल्या आजीला मरेपर्यंत मारत राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT