Shirdi Airport  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shirdi Airport : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! समृद्धी महामार्ग आणि 'वंदे भारत'नंतर आता शिर्डीत होणार 'नाईट लँडिंग'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

गोमन्तक डिजिटल टीम

नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या महामार्गासोबतच मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेसही सुरू करण्यात आली. या दोन प्रवास मार्गांनंतर आता विमान प्रवासाबाबतीत महत्वाची बातमी हाती येतेय. शिर्डी विमानतळावर आता रात्रीच्या वेळीही विमानाचं लँडिंग आणि टेकऑफ होणार आहे.

शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची परवानगी मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यालाच आता यश मिळाले आहे.

गुरुवारी सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.

नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त झाल्यामुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ अपेक्षित असून त्यामुळे येथील अर्थकारणाला गती प्राप्त होणार आहे.

नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला होता. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. त्यानंतर आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT