Goa Accident Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि त्यांचा साखरपुडा राहिला!

तीन वर्षाआधी ऐन नाताळ सणात दिल्लीस्थित पर्यटकाची कार अशाच प्रकारे जवळच्या खाडीत घुसली होती

दैनिक गोमन्तक

पुणे: रात्री उशिरापर्यंत पार्टी करून आलेल्या पुण्याच्या (Pune) दोघांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाल्याची घटना काल गोव्यात (Goa Accident Case) घडली. बागा-कळंगुट येथील खाडीत सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास या पर्यटक (Tourist) कार कोसळल्याने शुभम नितीन देडगे (Shubham Nitin Dedge) (28) आणि अभिनेत्री ईश्वरी देशपांडे (actress Ishwari Deshpande died.) यांचा मृत्यू झाला.

मात्र तोपर्यंत उशीर झाला होता

शुभम आणि ईश्वरी गाडीच्या सेंट्रल लॉकमुळे गाडीतच अडकले होते. त्यांच्या नाकातोंडात पाणी घुसले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या हणजूण पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गाडीत अडकून पडलेल्या शुभम तसेच ईश्वरी देशपांडे यांना प्राथमिक उपचारासाठी प्रयत्न केले होते मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

पिळर्ण अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खाडीत बुडालेल्या गाडीसहित मृतदेह बाहेर काढले. शुभम देडगे आणी ईश्वरी देशपांडे बुधवारी सकाळी पुण्यातील आपल्या निवासस्थानाकडून गोव्यात येण्यासाठी बाहेर पडले होते. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी सरळ जवळच्या खाडीत कोसळली.

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व तिचा मित्र शुभम देडगे यांची अनेक वर्षापासून मैत्री होती, त्यातुनच त्यांची मने जुळली होती आणि लग्नापूर्वी पुढच्या महिन्यात दोघांचा साखरपुडा होणार होता, त्यापूर्वीच नियतीने दोघांचाही घात केला.

गेल्या बुधवारपासून ‘ते’ गोव्यात होते

येथील शुभम देडगे तसेच ईश्वरी देशपांडे हे युगुल गेल्या बुधवारपासून गोव्यात होते. रविवारी बागा-कळंगुट येथील रात्रीची पार्टी संपवून हणजुणच्या दिशेने भरधाव वेगात ते कारने जात असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला. हणजुण पोलिसांनी मृतांच्या पुणे येथील कुटुंबियांशी संपर्क साधला असून रात्री उशिरापर्यंत ते गोव्यात येतील, असे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी सांगितले.

माडाचा झाडालाही धडक सोमवारी पहाटे घडलेल्या अपघातापूर्वी कारचालकाने (क्र : एम. एच -12 आरटी- 7766 ) बागा पुलावरून हणजुणच्या दिशेने भरधाव येत सर्वप्रथम रस्त्याशेजारच्या नारळाच्या झाडाला जोरदार धडक दिली होती व त्यानंतर त्याच वेगात गाडी सरळ बागा खाडीत उतरल्याचे स्थांनिकांनी सांगितले.

तीन वर्षांपूर्वीं घडली होती अशीच घटना

तीन वर्षाआधी ऐन नाताळ सणात दिल्लीस्थित पर्यटकाची कार अशाच प्रकारे जवळच्या खाडीत घुसली होती, मात्र त्यावेळी प्रसंगावधान राखीत चालकाने गाडीबाहेर उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले होते.

त्‍वरित रेलिंग लावा : लोबो

खाडीच्या समांतर लोखंडी रेलिंग उभारण्याचे आदेश मायकल लोबो यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती नागवा सरपंच राजेश मोरजकर यांनी दिली. ते म्हणाले, या दुर्घटनेनंतर मी तात्काळ कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांची भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT