राजेश टोपे Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारकडून 'दिवाळीनंतर' नागरिकांना गिफ्ट...

लसीच्या (Vaccine) पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेणयासाठी 84 दिवसांचा कालावधी (Period) दिलेला आहे. दोन्ही डोस मध्ये मोठे अंतर आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona) कमी होतोय. असे आरोग्य विभागाच्या एका अहवालातून समोर आले आहे. सध्या दररोजची कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दोन हजाराच्या आत येत असून मृत्यूंचीही संख्या कमी होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली. राजेश टोपे माध्यमांशी (Media) बोलताना म्हणाले, ‘एक लस घेतलेल्या नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवेश देणे आणि संपूर्ण राज्यात सर्वच अनलॉक करण्याचा विचार आहे.

तसेच, सर्वांसाठी उत्साह घेऊन येणार सण म्हणजे दिवाळी (Diwali). या दिवाळी सणानंतर नागरिकांनी कोरोनावरील एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश करण्याची मुभा असेल.

या बाबत मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय घेतील. दिवाळीनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेतला जाईल. यानंतर कोरोनाच्या नियमातून थोडीशी सूट म्हणून लसीची एक डोस देखील पुरेसा असणार आहे. मुख्यमंत्री (CM) हे टास्क फोर्सच्या सहमतीने दिवाळीनंतर याचा निर्णय घेतील. राज्यात हर्ड इम्युनिटी आलेली आणि टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची या बबडत सहमती असेल तरच हा निर्णय होवू शकतो.

कोरोनाच्या लसीच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेणयासाठी 84 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. दोन्ही डोस मध्ये मोठे अंतर आहे. यामुळे लोकांना त्याचा त्रास होत आहे. यामुळे आरोग्याविषयक (Health) बाबी लक्षात घेऊन याबाबत नागरिकांसाठी योग्य निर्णय घेतला जाईल’, असं टोपे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT