Four years old boy dies after house collapse in Mumbai  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईत घर कोसळून चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, पाच जण जखमी

लालजी पाडा परिसरातील केडी कंपाऊंडमध्ये दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.

दैनिक गोमन्तक

मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम उपनगरात शनिवारी सायंकाळी घर कोसळून एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर एका लहान मुलासह पाच जण जखमी झाले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालजी पाडा परिसरातील केडी कंपाऊंडमध्ये दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. या भागातील बीएमसीचा दुरुस्ती विभाग आर-दक्षिण प्रभागातील रस्त्याशी संबंधित काम करत आहे. (Four years old boy dies after house collapse in Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, नौशाद अली (4) याला अपघातानंतर रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या अपघातात हसीना शहा (22), शहीदुनिसा रैन (30), प्रेम यादव (38), मोहम्मद अन्सार (16) आणि तीन महिन्यांचा दिलशाद शहा हे जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. दिलशाद वगळता सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT