Kolhapur Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kolhapur: सेल्फीचा मोह अंगलट, चार तरुणींचा धबधब्यात बुडून मृत्यू

40 महाविद्यालयीन तरुणी पर्यटनासाठी याठिकाणी आल्या होत्या.

Pramod Yadav

Kolhapur: विकेंडला गेलेल्या चार तरुणींचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे. बेळगाव व चंदगड सीमेवरील चंदगड (Chandgarh) तालुक्यातील किटवाड येथे आज (दि.26) सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. किटवाड लघुपाटबंधारे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडल्याने चार तरुणींचा मृत्यू (Kolhapur Drowning) झाला आहे. तर एका तरुणीला वाचवण्यात यश आले.

असिया मुजावर (वय 17), कुदासिया पटेल (वय 20), रुक्षार बिस्ती (वय 20), तस्मिया (वय 20) असे मृत चार तरुणींची नावे आहेत. 12 फूट खोल असलेल्या या खड्ड्यात तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. 40 महाविद्यालयीन तरुणी पर्यटनासाठी याठिकाणी आल्या होत्या अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किटवाड येथे लघुपाटबंधारे विभागाची दोन धरणे आहेत. एक क्रमाकांच्या धरणावर ही घटना घडली असून, याठिकाणी 12 फूट खोल खड्डा आहे. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर तिसरी, चौथी व त्यापाठोपाठ पाच तरूणी खड्ड्यात पडल्या. पाचही बुडाल्या त्यापैकी चार जणींचा जागीच मृत्यू झाला, तर एकीच प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी तिला बेळगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT