Representative image of Cobra Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोब्राचे चुंबन घेण्याऱ्या तरुणाचा डाव फसला...

एका मुलाने कोब्राला चुंबन घेतल्याचा व्हिडिओ सोशलमिडीयावर व्हायरल होताच वनविभागाने त्या तरुणाचा शोध घेतला.

दैनिक गोमन्तक

साप (Snake) म्हटलं की अनेकांच्या अंगावर शहारे येतात! सापांच्या विषारी प्रजातींपैकी सर्वात विषारी साप म्हणजे कोब्रा. मात्र सापांसोबत स्टंटगिरी करताना अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना महाराष्ट्रातील वर्ध्यामध्ये घडली आहे. मात्र या घटनेत कोब्राचे चुंबन घेणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे पहायला मिळाले आहे. या तरुणाने कोब्राच्या चुंबनाचा व्हिडिओ बनवत तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र हा व्हिडीओ वनविभागापर्यंत पोहोचला आणि डाव फसला. ही माहिती मिळताच वनविभागाने तरुणाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आणि तरुणाचा शोध त्याच्यावर कारवाई सुद्धा केली. (Forest Department took action against the youth who misbehaved with the cobra snake)

कोब्राचे चुंबन घेणारा तरुण

एका मुलाने कोब्राला चुंबन घेतल्याचा व्हिडिओ सोशलमिडीयावर व्हायरल होताच वनविभागाने त्या तरुणाचा शोध घेतला. व्हीडीओमधील हा तरुण वर्धा येथील रहिवासी असून अभिनव जोशी (21) असे त्याचे नाव आहे. हा व्हिडीओ त्याने बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. युवकाला वन विभागाने अटक करून थेट न्यायालयात हजर केले. विशेष म्हणजे त्याला न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे.

या घटनेतील तरुण सापांना पकडून जंगलात सोडायचा. मात्र या तरुणाला अनेकदा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांसोबत व्हिडीओ बनवताना पाहिले. मात्र हा प्रकार कायद्याने गुन्हा असुन, साप हा प्राणी वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित प्राणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT