Mumbai Airport
Mumbai Airport Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर आज 6 तास विमानांची वाहतूक राहणार बंद...

दैनिक गोमन्तक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) मंगळवारी 6 तासांसाठी बंद राहणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये मंगळवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यादरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

(Flight traffic will be suspended at Mumbai airport for 6 hours today)

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक, सुरक्षित आणि अखंडित धावपट्टीपैकी एक असून याचे देखभालीचे काम सुरूच आहे.

अशा परिस्थितीत विमानतळाचे कामकाज उत्तम प्रकारे सुरू ठेवण्यासाठी CSMIA ने मंगळवार, 18 ऑक्टोबर रोजी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदनात, प्राधिकरणाकडून असे सांगण्यात आले आहे की विमानतळाच्या RWY 14/32 आणि 09/27 या दोन्ही धावपट्टीवर दुरुस्ती आणि देखभालीचे काम केले जाईल.

पावसाळ्यानंतर धावपट्टीच्या प्रतिबंधात्मक देखभाल अंतर्गत, धावपट्टीच्या काठावरील दिव्याचे अपग्रेडेशन, 14/32 साठी एजीएल यांसारखी मोठी कामे केली जातील.

सीएसएमआयएने सांगितले की, दररोज 800 हून अधिक विमाने उतरतात आणि टेक ऑफ करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांचा सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी दरवर्षी पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीचे काम राबवले जाते. याशिवाय, प्राधिकरणाने असेही म्हटले आहे की एअरलाइन ग्राहक आणि इतर प्रमुख भागधारकांच्या मदतीने देखभाल सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी फ्लाइट्स प्रभावीपणे पुनर्निर्धारित करण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

SCROLL FOR NEXT