PM Narendra Modi 
महाराष्ट्र

Maharashtra: नगरच्या उद्विग्न शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे पाठवले 'कांदे'

गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले.

Pramod Yadav

महाराष्ट्रात कांदा खरेदी आणि त्याच्या दरावरून सध्या मोठे वादळ सुरू आहे. विधानसभेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधकांनी सत्ताधारांना चांगलेच धारेवर धरत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. तत्पुर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच, राज्यात विविध ठिकाणी शेतकरी मोफत कांदा वाटप किंवा कांद्याचे पिक जाळून अथवा ट्रॅक्टरने नांगरून टाकत आहेत.

कांद्याचे भाव घसरल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाद्वारे 'कांदे' पाठवले आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने हे 'कांदे' पाठवले आहेत.

सरकारला कांद्याला भाव देता येत नसेल तर शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले.

दरम्यान, नाशिकच्या येवला तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने उद्विग्न होऊन आपल्या शेतात कांद्याची होळी केली. तसेच, अहमदनगरच्या बाजारपेठेत एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोन रुपये किलोचा भाव मिळाला. 17 गोण्या कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती केवळ एक रुपया पडला.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी या प्रश्नावरून रान उठवले आहे. शेतकरी संकटात असताना सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले. यावर, सरकारने कांदा खरेदीला सुरूवात केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT