DRDO Scientist Arrested: Dainik Gomantak
महाराष्ट्र

DRDO Scientist Arrested: पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला पुण्यातील DRDO चा शास्त्रज्ञ; गुप्त माहिती पुरवली

नोव्हेंबरमध्ये होणार होता निवृत्त; महाराष्ट्र ATS ने केली अटक

गोमंतक ऑनलाईन टीम

DRDO Scientist Arrested: पाकिस्तानला गुप्त आणि संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना गुरुवारी (4 मे) अटक केली.

एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, शास्त्रज्ञ कुरुलकर यांना पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिंग (पीआयओ) च्या एका व्यक्तीने हनी ट्रॅप केले होते. यानंतर कुरूलकर यांनी संवेदनशील माहिती गोळा करून ती पाकिस्तानातील व्यक्तीला देण्यास सुरुवात केली, असे कळते.

फेब्रुवारीमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांना शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅप केल्याची माहिती मिळाली. तो व्हिडिओ चॅट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात आले. यानंतर याची माहिती डीआरडीओला देण्यात आली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर डीआरडीओच्या दक्षता विभागाने तपास सुरू केला आणि अहवाल तयार केला. महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाचा तपास करत डॉ.कुरुलकर यांना अटक केली. कुरुलकर या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत.

आतापर्यंतच्या तपासात ते पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात आल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.

एटीएसने म्हटले आहे की, कुरूलकर यांना त्यांच्याकडील माहिती शक्षू राष्ट्राला मिळाली तर देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याची कल्पना होती. असे असतानाही त्याने हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी व्यक्तीला ही माहिती पुरवली.

त्याआधारे त्याच्याविरुद्ध मुंबईतील एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT