Donkey milk Dainik gomantak
महाराष्ट्र

अबब...गाढविणीच्या दूधाला चक्क हजारांची किंमत..!

हे दूध रस्त्यावर फिरून विकले जात असून चमचाभर दूध प्या आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवा असा दूध विक्रेत्यांचा दावा आहे

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील हिंगोली शहरात गाढविणीचे दूध विकले जात आहे. गाढविणीचे दूध प्यायल्याने शरीरात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते आणि ते खूप शक्तिशाली असल्याचा दावा दूध विक्रेते करत आहेत. हिंगोलीत गाढविणीचे दूध (milk) घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमत आहेत. आणि गाढविणीचे दूध 10 हजार रुपये लिटरने विकत घेतले जात आहे.

हिंगोलीत गाढविणीचे दूध रस्त्यावर फिरून विकले जात असून चमचाभर दूध प्या आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवा असा दावा विक्रेते करत आहेत. हे दूध पिण्याचे अनेक फायदे असल्याचे सांगत आहेत. मुलांना न्यूमोनिया होत नाही. याशिवाय ताप, खोकला, कफ यासारख्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम गाढविणीचे दूध करत आहे. असा दावा दूध विक्रेते करताना दिसत आहेत.

गाढविणीचे दूध प्यायल्याने अनेक आजार बरे होतात. हे अनेक आजारांवर गुणकारी आहे. एक चमचा दुधाची किंमत 100 रुपये असून एक लिटर दूध 10 हजार रुपयांना विकले जाते. तसेच गाढविणीच्या दुधात त्वचा आणि शरीर दोन्हीसाठी पोषक घटक असतात. हे दूध बाळाच्या जन्मानंतर तीन दिवस रोज पाजल्यास आयुष्यभर फायदा होतो. अस ही मत हे दूध विक्रेते करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT