...तर तुमचे सिम कार्ड होणार बंद, जाणून घ्या नवे नियम

सतत होणार आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल्स, ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणूकीच्या घटनांचा तपास करण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे.
Telecom Sector new rules for sim cards user & KYC
Telecom Sector new rules for sim cards user & KYCDainik Gomantak
Published on
Updated on

दूरसंचार विभागाने (Telecom Sector) जारी केलेल्या आदेशानुसार, जर ग्राहकांकडे परवानगीपेक्षा जास्त सिम कार्ड (Sim Card) आढळले तर त्यांना त्यांच्या आवडीचे सिम ठेवण्याचा आणि शिल्लक बंद करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. विभागाने सांगितले की, विभागाने केलेल्या विश्लेषणादरम्यान, एखाद्या ग्राहकाकडे सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या विहित संख्येपेक्षा जास्त सिम कार्ड असल्याचे आढळल्यास, सर्व सिमची पुन्हा पडताळणी केली जाईल.(Telecom Sector new rules for sim cards user & KYC)

सतत होणार आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल्स, ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणूकीच्या घटनांचा तपास करण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे. विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नियमानुसार वापरात नसलेले सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून हटवण्यास सांगितले आहे.

तत्पूर्वी सरकारने या वर्षी सप्टेंबरमध्ये सिम कार्ड KYC नियम बदलले होते. नवीन कनेक्शन घेण्यासाठी किंवा प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेड ते प्रीपेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. दूरसंचार कंपन्या डिजिटल माध्यमातून हा फॉर्म भरू शकतील.जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर किंवा टेलिफोन कनेक्शन घ्यायचे असेल तर तुमचे KYC पूर्णपणे डिजिटल असेल. म्हणजेच केवायसीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पेपर सबमिट करावे लागणार नाहीत. आता पोस्टपेड सिम प्रीपेड मिळण्यासारख्या सर्व कामांसाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. यासाठी डिजिटल केवायसी वैध असणार आहे.

Telecom Sector new rules for sim cards user & KYC
Most Powerful Womenच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण

नवीन नियमांनुसार, तुम्ही प्रोव्हायडरद्वारे सेल्फ-केवायसी करू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त 1 रुपये भरावा लागेल . सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने आपला प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेड ते प्रीपेडमध्ये बदलला तर त्याला प्रत्येक वेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मात्र आता केवायसी एकदाच करावे लागणार आहे.केवायसीसाठी ग्राहकांकडून काही कागदपत्रे मागितली जातात. जरी हे काम तुम्ही ज्या ठिकाणी सिम घेत आहात तिथे जाऊन केले पाहिजे, परंतु जर तुम्ही स्वत: ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कागदपत्रे अपलोड करून तुमचे केवायसी केले तर त्याला सेल्फ केवायसी म्हणतात. हे वेबसाइट किंवा अनुप्रयोगाद्वारे केले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com