Dodamarg Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Dodamarg Accident: पुढच्या सीटसाठी चिमुरडीनं हट्ट केला अन्... गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या कारचा दोडामार्गात भीषण अपघात

Dodamarg Accident News: दोडामार्ग तालुक्यातील 'केळीचे टेंब' येथे शनिवारी सकाळी एका पर्यटकांच्या कारचा अपघात झाला.

Sameer Amunekar

दोडामार्ग: नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या ओघ वाढला आहे. मात्र, याच प्रवासादरम्यान दोडामार्ग तालुक्यातील 'केळीचे टेंब' येथे शनिवारी सकाळी एका पर्यटकांच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगलोर येथील हे पर्यटक आपल्या खाजगी कारने गोव्याला फिरायला निघाले होते. शुक्रवारी रात्री त्यांनी बेळगाव येथे मुक्काम केला आणि शनिवारी पहाटे ते दोडामार्ग मार्गे गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. निसर्गरम्य कोकण आणि गोव्याच्या ओढीने निघालेल्या या पर्यटकांचा प्रवास सुरळीत सुरू होता, मात्र दोडामार्ग जवळील घाटात ही घटना घडली.

नेमका अपघात कसा झाला?

हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे किंवा वेगामुळे झाला नसून, कारमधील एका लहान मुलीच्या हालचालीमुळे घडला. कारमध्ये मागे बसलेली एक चार वर्षांची चिमुरडी चालकाच्या शेजारील सीटवर बसलेल्या आपल्या वडिलांकडे जाण्यासाठी धडपड करत होती.

मुलीला पकडण्याच्या नादात आणि तिच्या या गोंधळामुळे चालकाचे लक्ष अवघ्या काही सेकंदांसाठी विचलित झाले. याच क्षणी चालकाचा ताबा सुटला आणि कार मुख्य रस्त्यावरून खाली घळणीत (खड्ड्यात) उतरली.

कारचे मोठं नुकसान

रस्त्यावरून खाली उतरलेली कार वेगाने समोर असलेल्या एका मोठ्या झाडाकडे जात होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखल्याने कार झाडाला आदळता आदळता थोडक्यात बचावली. जरी कारचे मोठे नुकसान झाले असले, पर्यटकांना गंभीर इजा झाली नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT