Devendra Fadnavis & Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव कोणी पुढे केले? देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होताच राजकीय पेच मिटला आहे.

दैनिक गोमन्तक

Devendra Fadnavis on Eknath Shinde: महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होताच राजकीय पेच मिटला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप नेतृत्वाला मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर पक्षातील प्रमुख नेत्यांच्या सांगण्यावरुन मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis Says I Had Proposed To Bjp Leadership To Make Eknath Shinde Maharashtra Cm)

फडणवीस म्हणाले की, 'मी सरकारबाहेर राहून काम करणार हे पूर्णपणे ठरले होते. परंतु त्याचवेळी मला जेपी नड्डा, अमित शहा (Amit Shah) यांचा फोन आला आणि म्हणाले की,' तुम्ही सरकार बाहेर राहून चालणार नाही. मी पंतप्रधानांशी बोललो आहे.' त्यानंतर जेपी नड्डा मीडियासमोर आले आणि म्हणाले की, 'उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतील. पक्षामध्ये सर्वोच्च नेतृत्वाच्या निर्णयाचा नेहमीच आदर केला जातो.'

'सरकार अडीच वर्षे चालणार'

एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात शिवसेनेच्या (Shiv Sena) विरोधात बंडखोरी केली. त्यांच्या गटात 35 हून अधिक आमदार होते. सुमारे दोन आठवडे चाललेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. हे सरकार अडीच वर्षे चालणार असून पुन्हा सरकारमध्ये परतणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, '164 मते आमच्या सरकारच्या बाजूने आहेत. तीन्ही विरोधी पक्षांना एकूण 99 मते पडली. आमचे सरकार पूर्ण बहुमताने चालेल.'

दुसरीकडे, शिवसेनेत मोठा विरोधाभास असल्याचे ते म्हणाले. आम्ही जनतेसमोर कसे जाणार, असे संतप्त आमदार म्हणायचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT