crocodile rescue on mumbai-goa highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

दुचाकी चालकासमोर अचानक आली 3 फूटी मगर; मुंबई-गोवा महामार्गावर मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन, पहा व्हिडीओ

माणगाव वन विभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणात सामाजिक संस्था कोलाड यांनी मगरीला रेस्क्यू केले

गोमन्तक डिजिटल टीम

crocodile rescue : माणगाव इंदापूर येथे रस्त्यावर आलेल्या मगरीला रेस्क्यू करण्यात यश आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर मार्गावर खरवली फाट्याजवळ घडली. माणगाव वन विभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणात सामाजिक संस्था कोलाड यांनी मगरीला रेस्क्यू केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीने माणगावहून कोलाडच्या दिशेने मुंबई गोवा महामार्गावरून येत असताना प्रसाद महाडिक यांना खरवली फाट्याजवळ एक मगर रत्स्यावर आल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी सह्याद्री वन्यजीव रक्षणात सामाजिक संस्था कोलाड (SVRSS) यांना दिली.

घटनेची माहिती मिळताच संस्थेची रेस्कू टीम घटनास्थळी पोहचले. 3 फूट इतक्या लांबीच्या मगरीला संस्थेच्या सदस्यांनी व माणगाव वन विभागाच्या जवानांनी मगरीला सुखरूपरीत्या रेस्क्यू केले.

त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली माणगाव परिसरातील काळ नदीमध्ये मगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या मोहीमेत वनविभागासह रेस्क्यू टीमचे सदस्य सागर दहिंबेकर, श्वेता विश्वकर्मा, सुरज दहिंबेकर अजय राजीवले व प्रणय सागवेकर यांनी सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT