Nana Patole  Dainik Gomantak
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडीत बिघाडी ?

ओबीसी आरक्षणावरुन 'मविआ'मध्ये वादाची ठिणगी

दैनिक गोमन्तक

ओबीसी आरक्षणच्या निमित्ताने महाराष्ट्रात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मध्य प्रदेशनं ओबीसी राजकीय आरक्षण टिकवून दाखवलं तर महाराष्ट्राची गाडी अहवालावरच अडकून पडली. याबाबत प्रारंभी महाराष्ट्रात ही हे आरक्षण मिळेल अशी अपेक्षा अनेक राजकिय नेत्यांनी बोलून दाखवली होती. असे असले तरी मात्र मविआचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारला इशारा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. (Controversy erupts in 'Mavia' over OBC reservation )

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. याच दरम्यान आज मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत मविआमधील धुसफूसीवर खलबतं होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मुंबई ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेऊन नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं की, फडणवीस सरकार असताना 2017 पासून ओबीसींच्या राजकीय अधिकारांवर घाला घालण्यात आला. फडणवीस सरकारपासून ओबीसी समाजाला ग्रहण लागलं आहे. आजही ते संपलेलं नाही, म्हणून महाराष्ट्र ओबीसी समाजात आक्रोश आहे. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल आणि ओबीसी संघटना निवेदन मला दिले ते मी मुख्यमंत्र्यांना पाठवले. त्यामूळे या मुद्यावरुन आघाडीत बिघाडी होणार का ? याकडे विरोधीपक्ष लक्ष ठेऊन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT