Consesual Physical Relations Not Rape: मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आधी स्वखुशीने शारीरिक संबंध ठेवले आणि ब्रेकअप झाल्यावर त्याने माझ्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले.
हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जिथे खंडपीठाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला. स्वेच्छेने शारीरिक संबंध कलम 376 अंतर्गत बलात्कार मानले जाऊ शकत नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती एनआर बोरकर यांनी हा निकाल देत फौजदारी याचिका निकाली काढली.
आरोपी आणि पीडिता दोघेही पुण्यातील (Pune) रहिवासी आहेत. पीडितेने तरुणावर आरोप केला की, 'मी त्याच्यासोबत एका संस्थेत काम करत होते. यादरम्यान आमची मैत्री झाली. मात्र, एके दिवशी त्याने माझ्यासोबत बळजबरी करुन शारीरिक संबंध ठेवले, यादरम्यान मी विरोध केला.
त्याचे वागणे मला अजिबात आवडले नाही. त्यानंतर आमचे ब्रेकअप झाले. मी या प्रकरणी पोलिसात तक्रार केली आणि एफआयआर नोंदवला.' दुसरीकडे मात्र, याविरोधात आरोपी तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली, जिथे त्याला न्याय मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल 2022 रोजी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि धमकावण्याच्या कलमांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा जानेवारी 2019 ते 3 एप्रिल 2022 दरम्यान घडला होता.
दरम्यान तरुणाने आपल्या बाजूने स्पष्टीकरण देताना तक्रारदाराचे त्याच्याशी संमतीने संबंध असल्याचे सांगितले. या संदर्भात पीडितेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
आरोपीने पीडितेला नुकसान भरपाई दिली, मात्र वकिलाच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने हे मान्य केले की, दोघांनी समंतीने शारिरीक संबंध ठेवले होते. या आधारावर बचाव पक्षाच्या मागणीवरुन उच्च न्यायालयाने हा खटला रद्द करावा, कारण या गुन्ह्यात बलात्काराचे कलम लागू होत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.