Pramod Sawant while visiting Lord Shani Deva Dainik Gomantak
महाराष्ट्र

'देशात लवकरच राम राज्य येणार': मुख्यमंत्री सावंत

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळावे याकरीता संकल्प करुन शनिदेवाला साकडे घातले.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहेत. 14 फेब्रूवारी रोजी गोव्यात 40 जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल हा 10 मार्चला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते प्रमोद सावंत यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवांचे दर्शन घेऊन अभिषेक केला. या प्रसंगी त्यांनी माध्यामांशी दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील मंत्र्यांवर होत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) केलेल्या कारवाईचे समर्थन केले. (Chief Minister Pramod Sawant Said Ram Rajya will come to the country soon)

देशात लवकरच रामराज्य

मुख्यमंत्री सावंत यांनी आज दुपारी शनिशिंगणापुरला भेट दिली. प्रमोद सावंत म्हणाले की, महाराष्ट्रात एका मागोमाग एक मंत्र्यांच्या हातात बेड्या पडणे हे योग्य नाही. या घटनेत अडकणारे महाविकास आघाडीचे मंत्री आपल्या कर्माचे फळ भोगत आहेत, यात केंद्र सरकारचा काहीच हस्तक्षेप नाही, अशी टीका ही मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant) यांनी केली. शनिदेवाला काय मागितले असे विचारले असता त्यांनी गोवा राज्यात पुन्हा 'भाजपा'चे स्वराज्य नांदू दे व देशावर आलेले कोरोनाचे संकट पूर्णपणे हटू दे अशी प्रार्थना त्यांनी शनिदेवाला केली. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लवकरच रामराज्य येईल, असा विश्वास ही व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार ईडी यंत्रणेवर कुठलाच हस्तक्षेप करीत नसल्याचे सांगितले.

गोव्यातील स्थिती बाबत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कामांवर सर्वसामान्य जनता,शेतकरी, लहान-मोठे व्यावसायिक खुष आहेत. राज्यात केलेला विकास सर्वाना भावणारा आहे.त्यामुळे या निवडणुकीत 'भाजप' ला 22 ते 24 जागा नक्की मिळतील आसा अंदाज व्यक्त केला. येणारे सरकार हे पण आमचेच येणार असा विश्वास सावंत यांनी बोलताना व्यक्त केला.

यावेळी उदासी महाराज मठात त्यांनी शांतिपाठ, संकल्प, तेल अभिषेक व प्रार्थना करुन शनिदेवाचे दर्शन घेतले.यावेळी मंदिर प्रशासनातर्फे त्यांचा जनसंपर्क कार्यालयात देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी शाल, श्रीफळ व प्रसाद देवून सन्मान केला. यावेळी विश्वस्त दीपक दरंदले, बाळासाहेब बन्सी बोरुडे उपस्थित होते. यावेळी जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी देवस्थानच्या विकास कामांची माहिती दिली.

फडणवीस यांच्यासाठी साकडे..

मुख्यमंत्री सावंत यांनी उदासी महाराज मठात पुजा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळावे याकरीता संकल्प करुन शनिदेवाला साकडे घातले. या पूजेचे पौरोहित्य मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT