Covid-19 Vaccine  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोविड लसीच्या कमतरतेबाबत केंद्राचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) लसीचा (Vaccine) तुटवडाबद्दलच्या मीडिया रीपोर्टचे खंडन केले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातमध्ये (Maharashtra) कोरोना लसीच्या (Corona Vaccine) कमतरतेबद्दल मीडिया रिपोर्टसचे खंडन करतांना, आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की राज्यात कोव्हॅक्सिनचे (Covaxin) 24 लाखांहून अधिक डोस अपयुक्त आहेत आणि शुक्रवारी अतिरिक्त 6.35 लाख डोस मिळाले. मिळालेल्या अहवालानुसार कोरोना लसीचा तुटवडा असल्यामुळे राज्य सरकार लसीकारणाचा वेग वाढवू शकत नाही.

कोविन अॅपवर साप्ताहिक लसीकरणाच्या आकडेवारीनुसार 15 -17 वर्षे पात्र लाभार्थ्यांना लसीकरणासाठी (Vaccine) राज्याला कव्हर करण्यासाठी आणि बूस्टर डोससाठी (Booster Dose) राज्यात कोवॅक्सिन लसीचा सरासरी वापर दररोज सुमारे 2.94 लाख डोस आहे. राज्यांकडे लसीचे आतापर्यंत न वापरल्या गेलेल्या 24 लखाहून अधिक पुरेसा डोस आहे. त्यामुळे, राज्यांकडे 10 दिवसांच्या लसीकरणासाठी लसीचे मुबलक डोस उपलब्ध आहेत असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय मंत्रालयाने पुढे सांगितले आहे की कोविशिल्डसाठी राज्यात मिळालेल्या साठयासाठी 1.24 कोटी शिल्लक डोस उपलब्ध आहेत. दररोज सरासरी 3.57 लाख लसीच्या वापरासह हा साठा 30 दिवसांपेक्षा जास्त काल लसीकरणासाठी पुरेसा आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे मीडिया रिपोर्टने दिलेली माहिती चुकीची असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT