Bombay High Court Dainik Gomantak
महाराष्ट्र

Bombay High Court: आईच्या ताब्यातून मुलाला जबरदस्तीने वडिलांनी नेले, अपहरणाचा गुन्हा दाखल होणार की नाही? वाचा HC चा निर्णय

Bombay High Court: आईसोबत अल्पवयीन मुलाचे बायोलॉजिकल वडील देखील कायदेशीर पालक आहेत.

Manish Jadhav

Bombay High Court Verdict Child Kidnapping From Mother: पती-पत्नीमधील कौटुंबिक वादानंतर वडिलांनी मुलाला जबरदस्तीने सोबत नेले तर त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करता येईल की नाही? या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आईच्या ताब्यातून जबरदस्तीने नेले तर त्याचा अर्थ त्याने त्याचे अपहरण केले असा होत नाही.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेजेस यांच्या खंडपीठाने निर्णय दिला की, न्यायालयाने अल्पवयीन मुलाचा ताबा आईकडे न दिल्यास अशा प्रकरणांमध्ये बायोलॉजिकल वडिलांवर आयपीसी अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करता येणार नाही.

अपहरण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने महिलेच्या पतीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करताना म्हटले आहे की, आईसोबत अल्पवयीन मुलाचे बायोलॉजिकल वडील देखील कायदेशीर पालक आहेत. त्यामुळे त्याने कलम 361 अन्वये गुन्हा केला आहे असे म्हणता येणार नाही.

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, वडिलांची कृती आईच्या कायदेशीर पालकत्वातून मुलाला वडिलांच्या कायदेशीर पालकत्वाकडे नेण्यासारखी आहे.

खंडपीठाने निर्णय दिला की, जोपर्यंत वडिलांच्या पालकत्वाच्या अधिकारांचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत त्याला कलम 361 अंतर्गत गुन्ह्यासाठी दोषी ठरवता येणार नाही.

दरम्यान, अमरावती पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 29 मार्च रोजी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप करत त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

आता या प्रकरणात, न्यायालयाने हिंदू अल्पसंख्याक आणि पालकत्व कायदा, 1956 च्या कलम 6 चा हवाला देत सांगितले की, हिंदू अल्पवयीन मुलासाठी, वडील बायोलॉजिकल पालक आहेत आणि आई देखील.

प्रथमदर्शनी विचार करता अपहरणाचा गुन्हा घडला नाही. अशा परिस्थितीत आरोप सुरु ठेवणे हा न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर होईल. हिंदू अल्पवयीन मुलासाठी, बायोलॉजिकल पिता पालक आहे आणि आई देखील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT