Bombay High Court Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिविगाळ केली म्हणून मुलगा वडिलांची हत्या करू शकत नाही; न्यायालयाने फटकारले

वडिलांनी आपल्या मुलाला खडसावले म्हणून त्यांची हत्या करणे हे योग्य नाही.

दैनिक गोमन्तक

कोणत्याही वडिलधाऱ्या माणसांचा आदर करणे आपल्याला शिवकलं जातं. परंतु अलीकडे वयाचे भान विसरत लहान-मोठ्यांचा विचार न करता कुणीही कुणालाही शिविगाळ करायला किंवा मारहान करायलाही मागे पुढे बघत नाही. म्हणून आता चक्क कोर्टालाच याबाबत नियम करून त्याची सुनावणी करण्याची वेळ आली आहे.

कोणत्याही वयस्कर माणसाला ठार मारण्यासाठी चिथावणी कोणीही देऊ शकत नाही, असा पवित्रा मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने नुकताच जाहीर केला आहे. कोल्हापूर आणि शिर्डी येथील पुजारी असलेल्या पुरुषाची शिक्षा कायम ठेवत खंडपिठाने हा निर्णय दिला आहे.

कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली त्याची जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टानेही कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती विश्वास जाधव आणि संदिपकुमार मोरे यांच्या खंडपीठासमोर उस्मानाबादचे रहिवासी असलेले 29 वर्षीय नेताजी तेले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी सुरू होती. नेताजी यांना डिसेंबर 2014 मध्ये एका वयस्कर व्यक्तीला शिवीगाळल केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

फिर्यादीच्या खटल्यानुसार, नेताजी हे कोल्हापूर आणि शिर्डी येथील मंदिरांचे पुजारी होते. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यानी मंदिरात पुजा करणे सोडून कुठेतरी काम करावे आणि स्वत:चे चांगले भविष्य घडवावे. मात्र डिसेंबर 2013 मध्ये नेताजींच्या वडिलांनी त्यांना फटकारले आणि जर त्याने काही योग्य काम केले नाही तर घरी येऊ नको असे. वडिलांच्या या टोमण्याला त्रासून आणि रागाच्या भरात नेताजींनी आपल्या वृद्ध वडिलांना श्रीमुखात लगावली.

वडिलांनी त्यांच्या या वागण्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित करताच मुलगा नेताजीने आपल्या वडिलांवर चक्क चाकू काढला आणि आपल्या वडिलांवर वार केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि नेताजींनी न्यायमूर्ती जाधव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला रागाच्या भरात मी हे कृत्य केल्याचे सांगितले.

वडिलांनी मला केलेल्या शिवीगाळामुळे मी अचानक भडकलो, मला राग अनावर झाला, असा युक्तिवाद पुजारी नेताजीने केला. त्याने आपल्या वडिलांची हत्या केल्याने त्याच्या या गुन्ह्याकडे दुर्लक्ष केले जावू शकत नाही, वडिलांनी आपल्या मुलाला खडसावले असे जरी आपण गृहीत धरले तरी, अशा गोष्टिमुळे कोणत्याही व्यक्तीने आपल्या रागावरील नियंत्रण गमाण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे नेताजीने केलेले कृत्य गुन्हाच सिद्ध होत असल्याचे न्यायाधीश म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT