Rescue operation at the Bhiwandi building collapse site Dainik Gomantak
महाराष्ट्र

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Bhiwandi Building Collapse Video: महाराष्ट्रातील भिवंडी येथे गुरुवारी उशिरा रात्री घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.

Sameer Amunekar

महाराष्ट्रातील भिवंडी येथे गुरुवारी उशिरा रात्री घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. गंगारामवाडी परिसरातील भंडारी कंपाउंडमधील कोहिनूर अपार्टमेंटच्या एका विंगचा मोठा भाग अचानक कोसळल्याने आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले असून काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

जीव वाचवण्यासाठी धाडसी निर्णय

दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांनी त्या रात्रीचे थरारक क्षण सांगितले. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर काही क्षणांतच इमारतीतून मोठा कडाडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच अनेकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने काही रहिवाशांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला.

एका रहिवाशाने सांगितले की, उडी मारताना त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याचवेळी स्थानिक तरुणाने आणलेल्या शिडीमुळे अनेकांना खाली उतरून सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य झाले. इमारतीत त्या वेळी अनेक कुटुंबे वास्तव्यास होती.

दुसऱ्या एका रहिवाशाने सांगितले की, रात्री झोपेची तयारी सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला. बाहेर पडताच सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. जीव वाचवण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता पहिल्या मजल्यावरून उडी घ्यावी लागली.

दरम्यान, इमारतीजवळील पार्किंग परिसरात असलेल्या एका महिलेनेही दुर्घटनेतून थोडक्यात बचाव केला. इमारतीत तडे जात असल्याचा आवाज ऐकताच ती धावू लागली; मात्र काही क्षणांतच इमारतीचा भाग कोसळला आणि त्या गोंधळात ती जखमी झाली.

नातेवाईकांचा शोध अद्याप सुरू

दुर्घटनेनंतर अनेक कुटुंबीय आपल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. एका महिलेने सांगितले की, तिचे पती काही वेळासाठी खाली गेले होते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत इमारतीचा भाग कोसळला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

बचावकार्य युद्धपातळीवर

घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाची पथके बचाव आणि शोधमोहीम राबवत आहेत. ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राथमिक माहितीनुसार, इमारत कोसळण्यापूर्वी काही रहिवाशांनी मोठे तडे आणि कडाडण्याचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला असून इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबतही चौकशी केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT