amboli
amboli 
महाराष्ट्र

यंदा आंबोली बंद

Dainik Gomantak

ओरोस

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर तेथील स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने बंदी आणण्यात येत होती; मात्र जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली धबधब्यासह 11 ठिकाणांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. त्यामुळे उन्हाळ्या पाठोपाठ पावसाळी पर्यटन हंगाम कोरडा जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. विषाणू प्रसारास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मांगेली, तिलारी धरण, कोनाळकट्टा, बाबा धबधबा, कुंभवडे, आंबोली धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, धामापूर तलाव, कासारटाका, सावडाव धबधबा, शिवडाव धबधबा या ठिकाणी वैयक्तीक किंवा सामुदायिकरित्या एकत्र येण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.
आदेशांची अंमलबजावणी पोलिस प्रशासन, तालुका दंडाधिकारी, ग्रामपंचायत व इतर विभागांनी काटेकोरपणे करावयाची आहे. या आदेशाचा भंग केल्यास साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र गुन्हा ठरणार आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
कोरोनाने शिरकाव केल्यानंतर केंद्राने 16 मार्चपासून लॉकडाउन केले. लॉकडाऊन मेपर्यंत राहिले. मे येथील पर्यटनाचा बहराचा कालावधी होता. पर्यटकच लॉकडाउन असल्याने जिल्ह्यात कोणी फिरकले नाहीत. परिणामी उन्हाळी हंगाम कोरडा गेला. जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे काही कोटींचे नुकसान झाले. हा हंगाम गेल्यानंतर पावसाळी हंगाम तरी फलदायी जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु कोरोनाची दहशत कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा स्थिरावलेला आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश जारी केले.
या वर्षी जिल्ह्यात एक जूनपासून पावसाने जोरदार आगमन केले आहे. त्यामुळे नदी, नाले, तलावे पहिल्या आठवड्यात भरून वाहू लागले आहेत. आंबोली, मांगेली, कुंभवडे येथील बाबा धबधबा, सावडाव व शिवडाव धबधबे प्रभावित झालेले आहेत. पावसाने सुरुवातीलाच जोरदार बॅटिंग केल्याने यंदा पावसाळी पर्यटनाला सुगीचे दिवस आल्याचे वाटत होते; पण कोरोनाने उन्हाळ्या पाठोपाठ पावसाळी पर्यटन कोरडे जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

SCROLL FOR NEXT