Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Goa News : यावेळी विनय तेंडुलकर म्हणाले की, मगो पक्ष भाजपसोबत आहे. अफाट कार्यकर्त्यांचे बळ मगो पक्षाकडे आहे. त्यामुळे प्रियोळ मतदारसंघात जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल.
Goa
GoaDainik Gomantak

Goa News :

सावईवेरे, येथील मदनंत सभागृहात वेरे-वाघुर्मे व वळवई पंचायत क्षेत्रातील मगोप कार्यकर्त्यांची सभा पार पडली. गेल्या पाच लोकसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना प्रियोळ मतदारसंघातून मताधिक्य मिळालेले आहे.

यंदाच्या निवडणुकीत अधिकाधिक मताधिक्य मिळेल. मगोप व भाजपातर्फे श्रीपाद नाईक यांना प्रियोळ मतदारसंघातून २० हजार मते मिळतील असा ठाम विश्वास या सभेत व्यक्त करून श्रीपाद नाईक यांना सहाव्यांदा लोकसभेत पाठवून डबल हॅटट्रिक करण्याचे आवाहन वक्त्यांनी केले.

व्यासपीठावर मगोप पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार दीपक ढवळीकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी, वेरे-वाघुर्मेच्या पंच लोचन नाईक, स्वाती पालकर, वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, उपसरपंचा मिताली शेट, पंच अंजली वेंगुर्लेकर, माजी सरपंच अंकिता नाईक, अंजली नाईक, गोकुळदास प्रभू, केरीच्या सरपंचा तृप्ती नाईक, लक्ष्मीकांत खेडेकर, रंगनाथ पालकर, सच्चित पालकर आदी उपस्थित होते.

यावेळी विनय तेंडुलकर म्हणाले की, मगो पक्ष भाजपसोबत आहे. अफाट कार्यकर्त्यांचे बळ मगो पक्षाकडे आहे. त्यामुळे प्रियोळ मतदारसंघात जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल.

Goa
Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

दीपक ढवळीकर म्हणाले की, २०१२ साली मगोप व भाजपाच्या युतीमुळे श्रीपाद नाईक यांना प्रियोळ मतदारसंघातून उत्तम मताधिक्य मिळाले होते. यंदा त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ. मताधिक्याने कोण श्रेय घेणार हा अहम भाव बाजूला ठेवून एकसंध राहावे. गेली १७ वर्षे मगोपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जसा विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वास अजूनही कायम आहे.

यावेळी प्रिया चारी, लक्ष्मीकांत खेडेकर व स्वाती पालकर यांनीही विचार मांडले. सूत्रनिवेदन वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com