Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या नावाने आजामीनपत्र वॉरंट

Sanjay Raut: काही दिवसापुर्वी संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या किरीट यांच्यावर केला होता.

दैनिक गोमन्तक

Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने आरोप -प्रत्यारोप सुरु असतात. अशाच एका आरोपावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

काही दिवसापुर्वी संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या किरीट यांच्यावर केला होता. यावरून सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला आहे. याप्रकरणाच्या सुनावणीला संजय राऊत न्यायालयात सुनावणीसाठी हजर होऊ शकले नाहीत.

त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला द्यावेत,अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, संजय राऊतांनी मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात श्रामती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी, भाजप( BJP ) नेते नारायण राणे यांनी संजय राऊत( Sanjay Raut ) यांना पुन्हा जेलवारी घडवणार असल्याचे वक्तव्य केले होते.अशातच आज राऊतांविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT