Ajit Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बजेट- अजित पवार

Maharashtra: वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्पाची मांडणी केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कौतुक केले आहे.

आता या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, मूळ प्रश्नांना बगल देऊन 2023-24च्या अर्थसंकल्प तयार केला आहे.

पुढे या अर्थसंकल्पाबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य हे देशातले सगळ्यात जास्त कर देणारे राज्य आहे. पण तरीही महाराष्ट्रा( Maharashtra)साठी काही तरतूदी केलेल्या दिसत नाहीत. अर्थसंकल्पाचे संपूर्ण भाषण आम्ही काळजीपूर्वक पाहिले आहे त्यात नवीन काहीच नाही.

जम्मू( Jammu)पासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांना समान दर्जा केंद्राने द्यायला हवा होता मात्र आता आगामी निवडणुका लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडला आहे. 9 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या अर्थसंकल्पाची मांडणी केली आहे. निवडणुकांमुळे केंद्र कर्नाटकवर मेहेरबान झाल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे. दरम्यान, शिंदे गटाने या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT