महाराष्ट्र: कोरोनाच्या Covid 19 महामारीच्या संकटामुळे 2 वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे बंद होती. एकादशीला देशातून विठ्ठल Vitthal भक्त आपली वारी पोहचवत असतात. त्या भक्तांना कोरोनामुळे आपली वारी करता आली नाही.आता मंदिर समितीने सर्व भक्तांना दिलासा देत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन (Vittal Rukmini Temple) घेता येणार.
यामध्ये दररोज किमान 10 हजार भक्तांना दर्शन मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे कोरोना चाचणीची (Corona Test) गरज नसली तरी आरोग्य तपासणी केल्यानंतरच मंदीरात Temple प्रवेश मिळणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मंदिर समितीकडून घटस्थापनेच्या Ghatsthapana मुहूर्तावर भाविकांसाठी मुखदर्शनाही सोय करण्यात आली आहे.
या बाबत मंदिर समितीची बैठक पार पडली. विजया दशमीच्या मुहूर्तावर सकाळी सहा वाजलेपासून ते सात पर्यंत पंढरपूर Pandharpur येथील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाईल. तसेच सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा पर्यंत ऑनलाईन Online आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन घेता येईल.
मंदिर समितीने प्रत्येक तासाला किमान सातशे ते एक हजार भाविकांना मुख दर्शन घेता येईल याची व्यवस्था केली आहे. मात्र यामध्ये 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन असे दर्शन दिले जाईल. तसेच दहा वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील वयोवृद्ध नागरिक आणि गर्भवती महिला यांना शासनाच्या आदेशानुसार दर्शनासाठी मात्र कायम बंदीच ठेवली आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट सक्तीची नाही. मात्र रांगेत आलेल्या भाविकांची आरोग्य तपासणीही केली जाईल. तसेच मंदिरांमध्ये काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची employee कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.