Nitesh Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

पाच तासांच्या चौकशीनंतर नितेश राणेंना घेवून पोलीस गोव्याच्या दिशेने रवाना

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयाने सुनावलेली दोन दिवसांची पोलिस कोठडी उद्या संपत आहे. त्यामुळे उद्या राणेंना कणकवली पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे यांचा संबंध असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. काल आमदार नितेश राणे यांना झालेल्या अटकेच्या पाश्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. (After Interrogation The Police Took Nitesh Rane And Left For Goa)

दरम्यान, आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने सुनावलेली दोन दिवसांची पोलिस कोठडी उद्या संपत आहे. त्यामुळे उद्या राणेंना कणकवली पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे यांच्यावर जमाव बंदीचा आदेश मोडल्या प्रकरणी आणि पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, आमदार नितेश राणे यांच्या पाच तास चाललेल्या चौकशीनंतर कणकवली पोलिसांनी त्यांना गोव्याच्या दिशेने रवाना केले आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी चाललेल्या चौकशीचा एक भाग म्हणून त्यांना कणकवली पोलिस गोव्यात घेऊन जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

SCROLL FOR NEXT