Aditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, निकटर्तीयांवर आयकर विभागाचा छापा

शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी ट्रस्टचे सदस्य राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या ठिकाणांवर मंगळवारी आयकर विभागाने छापा टाकला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. यातच महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडी कोठडीत रवानगी झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच गढूळ बनलं. याच पाश्वभूमीवर आता शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी ट्रस्टचे सदस्य राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या ठिकाणांवर मंगळवारी आयकर विभागाने छापा टाकला आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय मानले जातात. (Aditya Thackeray's close confidante Rahul Kanal has been raided by the Income Tax Department)

दरम्यान, आयकर छाप्यांबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्रावर असे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. आणि आताही होत आहेत. यापूर्वी केंद्रीय यंत्रणांचा अशा प्रकारे गैरवापर बंगाल, आंध्र प्रदेशात झाला आहे. आणि आता महाराष्ट्रातही महानगरपालिका निवडणुकींच्या पाश्वभूमीवर धाडसत्र सुरु झाले आहे. या केंद्रीय एजन्सी एक प्रकारे भाजपचीच प्रचार यंत्रणा बनल्या आहेत, पण आम्ही झुकणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही.'

तसेच, गेल्या महिन्यात शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या मुंबईतील ठिकाणांवर करचुकवेगिरीच्या आरोपावरुन आयकर विभागाने छापा टाकला होता. जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत. जाधव हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत आर्थिक बाबीसंबंधीच्या समितीचे प्रमुख आहेत. महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीमधील नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हणत फेटाळून लावले होते.

शिवाय, महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय उलथापालथ झाली आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांनाही विविध प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची विविध प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT