ambil odha 
महाराष्ट्र

आंबिल ओढा परिसरातील घरावर बुलडोजर; भर पावसाळ्यात अनेकांचा संसार रस्त्यावर

गोमन्तक वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे, पावसाळ्यात कारवाई न करण्याचा नियम असतांना ही कारवाइ करण्यात येत असल्याने स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. स्थानिकांनी कारवाईला विरोध करत आंबिल ओढा परिसरात आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्नही केला आहे. यावेळी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत मोठी गर्दी केली आहे. खासगी बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.(Action is being taken to remove encroachment in Ambil Odha area of Pune district)

सध्यस्थिती बघता या परिसरातील नागरीकांना कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता हे अतिक्रमण करण्यात येत असल्याचे सागंण्यात येत आहे. स्थानीकांना खाजगी बिल्डरने नोटिस पाठवली असून त्या नोटिसवर पुणे महानगरपालिकेचा शिक्का नाही. त्यामुळे ही कारवाई कुणाच्या परवानगिने केली जात आहे असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पन्नास वर्षापासून हे स्थानिक येथे राहत असून पहाटे पाच वाजता त्यांच्यावर ही कारवाई होणार अशी माहिती त्यांना पोलिसांनी दिली. आणि अद्यापही ही कारवाई सुरूच आहे.

पुण्यातील आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्या वतीनं अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येत आहे. या दरम्यान पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये हातापाईही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.  आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या जागेवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर होती असा आरोप या परिसरातील स्थानिकांनी केला आहे. ही कारवाई अचानक करण्यात आली नसून पूराची परिस्थिती लक्षात घेता ही कारवाई करण्यात येत आहे. फक्त या लोकांचे पर्यायी पुनर्वसन करायला हवं, असं पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं.

पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असताना या प्रक्रियेत नैसर्गिक नाले व ओहोळ एका मागोमाग एक नाहीसे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिमेंट क्रॉक्रिटचे जंगल फोफावत असुन त्यात नैसर्गिक घटकांची जपवणूक करण्याचे दायित्व लक्षात घेतले गेले नाही. इतके सारे घडूनही आजही नाले बुजविण्याचे उद्योग थांबले नसल्याचे अधोरेखीत होत आहे. आणि गंभीर बाब म्हणजे, ही पराक्रम एखाद्या बांधकाम व्यावसायिकाप्रमाणे खुद्द महापालिका विकासाच्या नावाखाली करत आहे, असे किशोर कांबळे  म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT