Ratnagiri Crime  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

Human Skeleton Found at Ratnagiri: रत्नागिरीत सापडला अज्ञात मृतदेह

गोमन्तक डिजिटल टीम

Khed- Ratnagiri Crime News

खेड : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुरुवारी धक्कादायक घटना उघडकीस आली. खेडच्या भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी आढळल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत, मात्र हा प्रकार इथेच थांबत नाही.

एका माणसाने हाच मृतदेह स्वप्नात दिसल्याचा दावा केला होता आणि पोलिसांनी खरोखर घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर अगदी तसाच मृतदेह सापडला आहे. 'रात्री पडलेल्या स्वप्नाचा' उल्लेख चक्क पोलिसांच्या एफआयआरमध्येही करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गातील सावंतवाडीत राहणाऱ्या योगेश आर्या (वय ३० वर्षे) या तरुणाला दोन दिवसांपूर्वी स्वप्नात एक मृतदेह दिसला होता. योगेशने याची माहिती पोलिसांनी दिली. सुरूवातीला पोलिसांनी विश्वास ठेवला नाही, शेवटी योगेशच्या आग्रहाखातर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करण्याचे ठरवले.

डोंगरावर एक प्रेत आहे. तो माझ्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय की मला मदत करा.
योगेश आर्या

भोस्ते घाटातील एका झाडाजवळ पोलिसांना वास येत होता. पोलिसांनी परिसरात कसून शोध घेतला असता एक प्रेत पडलेले दिसले. फादींला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो मृतदेह होता. तिथून पुढे काही अंतरावर एक कवटी देखील होती.

घटना बऱ्याच महिन्यांपूर्वीची असावी, निर्जन परिसर असल्याने तिथे कोणी पोहोचू शकले नाही आणि मृतदेह कुजला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मृतदेह कोणाचा आहे, ही आत्महत्या आहे की हत्या याचा पोलीस तपास करत आहे. मात्र, एफआयआरमधील स्वप्नाचा उल्लेख याची सध्या कोकणात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT