amit shah  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra-Karnataka: सीमाप्रश्नावर संविधानिक पद्धतीने मार्ग काढता येऊ शकतो- अमित शाह

Maharashtra-Karnataka : आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांबरोबर बैठक पार पडली.

दैनिक गोमन्तक

Maharashtra-Karnataka :मागच्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चर्चेत आहे. महाराष्ट्रातील काही गावांनी सोई सुविधा मिळत नसल्याने कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यात जाण्याची मागणी केली होती. वाद अधिक वाढण्याचे कारण म्हणजे कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरुन ट्रकवर हल्ला केला होता. त्यांनतर हा वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला होता.

केंद्राने याप्रश्नावर मार्ग काढावा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंम्मई यांच्याशी चर्चा करावी यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांबरोबर बैठक पार पडली. त्यानंतर अमित शहांनी म्हटले आहे कि , महाराष्ट्र ( Maharashtra ) कर्नाटक सीमाप्रश्नावर दोन्ही राज्याशी चर्चा केली आहे. संविधानिक पद्धतीने यावर मार्ग निघू शकतो.

सुप्रिम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणत्याही राज्याने कोणत्याही प्रदेशावर हक्क सांगू नये. विवाद करू नयेत. दोन्ही राज्याचे 3-3 असे सहा मंत्री या सीमाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी चर्चा करतील. यातून मार्ग निघेल असे अमित शहांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, राज्यातील इतर नेत्यांना देखील शांततेचे आवाहन केले आहे. आता राज्यातील इतर नेत्यांची यावर काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: कुंकळ्ळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

SCROLL FOR NEXT