Child Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kolhapur : गव्हाच्या पिठात पडून 9 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यु; कोल्हापूर मधील ह्रदयद्रावक घटना

चिमुकल्याचा दुर्देवी निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Kolhapur : कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात वडणगे येथून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत  9 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चिमुकल्याचा दुर्देवी निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे यमनगर कुटुंब राहत होते. या कुटुंबातील सुप्रिया यमगर या आपला नऊ महिन्याचा मुलाला घेऊन आपल्या आजीकडे आल्या होत्या. त्या मुलाचे नाव कृष्णराज यमनगर ( वय 9 महिने ) असे होते. तर आजी करवीर तालुक्यातील वडणगे येथे राहत होती.

मृत कृष्णराज हा सायंकाळी घरात वॉकर मध्ये बसून खेळत होता. वॉकर घेवून खेळताना तोल जाऊन तो गव्हाच्या पिठाच्या बुट्टीत तोल जाऊन पडला आणि रडू लागला. त्याच्या नाकातोंडात पीठ गेल्याने त्यामुळे त्याच्या श्वास गुदमरू लागला.

श्वासनलिकेत पीठ गेल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दरम्यान, आजीने त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा यावेळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fire In Gujarat Titans Team Bus: फायनलनंतर मोठी दुर्घटना! गुजरातच्या बसला आग; शुभमन गिल, बटलरसह सर्व खेळाडू 1 तास रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं?

Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

SCROLL FOR NEXT