6 killed and 10 injured in bus truck accident in Beed Dainik Gomantak
महाराष्ट्र

बीडमध्ये बस-ट्रकची धडक 4 ठार, 10 जखमी

आतापर्यंत अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र हा अपघात किती भीषण होता, हे यावरून 4 जणांचा जागीच मृत्यूवरून दिसून येतंय

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात बस ट्रकचा (Bus truck accident) अपघात झाला आहे . आज सकाळी झालेल्या या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील सायगावजवळ बसची ट्रकला धडक बसली. ही टक्कर इतकी भीषण होती की 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस लातूरहून औरंगाबादच्या दिशेने जात होती.

रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई मार्गावर राज्य परिवहन बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. ट्रक अंबाजोगाईहून लातूरच्या दिशेने येत होता. ट्रकमध्ये प्लास्टिकचे पाईप भरले होते. बस बर्दापूर फाट्याजवळ वळणावर येताच ट्रकची समोरासमोर धडक झाली.

अपघाताचे कारण अस्पष्ट

आतापर्यंत अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र हा अपघात किती भीषण होता, हे यावरून 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने समजते. ट्रकही ओव्हरलोड होता. त्यामुळे हा अपघात इतका भीषण झाला. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: भविष्यात गोव्यातील लोकांकडे 'पैसा' असेल, पण स्वत:ची 'जमीन' व 'गोंयकारपण' असणार नाही..

Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

Goa Coconut Price: नारळ महागला! स्थानिक उत्पादन कमी, परराज्यातून आवक; शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी

SCROLL FOR NEXT