Devgad Sindhudurg Dainik Gomantak
महाराष्ट्र

सहल बेतली जीवावर! सिंधुदूर्गातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील 4 मुलींचा बुडून मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता

Pramod Yadav

Devgad Sindhudurg: कोकणात पर्यटनासाठी आलेले पाच विद्यार्थी सिंधुदूर्गातील देवगड समुद्रात बुडाले आहेत. यापैकी चार मुलींचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीचे 35 जण सहलीसाठी देवगड येथे आले होते. समुद्रात आंघोळीसाठी गेले असता पाच विद्यार्थी बुडाले. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे असे मृत मुलींची नावे आहेत, तर राम डिचोलकर असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 विद्यार्थी सहलीनिमित्त देवगड येथे आले होते. आंघोळीसाठी पाच जण समुद्रात उतरले, पण पाचही जण पाण्यात बुडाले. यापैकी चार मुलींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एक विद्यार्थी बेपत्ता आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह अद्याप सापडला नसून स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT