Pune Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर चाकू हल्ला; मुलीची प्रकृती गंभीर

मुलीला रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल

दैनिक गोमन्तक

Pune Crime News: अल्पवयीन मुलींच्या प्रेमप्रकरणांमुळे अनेक गुन्हे घडत असतात. ज्यामुळे मुलींच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर चाकू हल्ला करण्याची घटना पुण्यात घडली होती. या धक्कादायक घटनेत जखमी झालेल्या मुलीची प्रकृती आता चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थिनीला सुरुवातीला सिटी हॉस्पिटलमध्ये (Hospital) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता प्रकृती चिंताजनक असल्याने या अल्पवयीन मुलीला रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (10th standard Girl was attacked with sharp weapon in pune)

एकतर्फी प्रेमात या विद्यार्थिनीवर चाकू हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस स्थानकात गुन्हा (Crime) नोंद करण्यात आला आहे. पोलीस यासंदर्भातील अधिक तपास करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

या विद्यार्थिनीसोबत प्रेमाचे नाटक करत तरुणाने मुलीला फसवले होते. आपल्या नात्याबद्दल दोघांच्या घरी सांगेन, असे म्हणत त्याने तिला धमकावले होते. यावरून मुलीला लुटल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT