आज पल्स पोलिओ दिवस २०२५ (Pulse Polio Day 2025) निमित्त देशभर मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत, सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) वाळपई येथे आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक यांनी इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत मिळून बालकांना तोंडामार्फत दिला जाणारा पोलिओ डोस दिला. देशभर आज ५ वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओचे थेंब पाजले जात आहेत.
धारगळ जिल्हा पंचायत मतदार संघातील अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर शिवाजी यांचा प्रचार.देवेंद्र प्रभुदेसाई,पंच सुनीता देसाई यांची उपस्थिती.
आम आदमी पक्षाने हणजूण येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले जनसंपर्काचे प्रयत्न तीव्र केले आहेत. 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हणजूण येथे उमेदवाराच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात दारोदारी प्रचार मोहीम हाती घेतली आहे.
बागा-हडफडे येथील बुलेट शोरूमजवळ, कर्मा मॉन्टेरो हॉटेलजवळ आज, रविवारी सकाळी ११ वाजून ०४ मिनिटांनी दोन मोठ्या डिझेल जनरेटरला भीषण आग लागल्याची घटना घडली. हे जनरेटर जवळच्या हॉटेल आस्थापनांसाठी वीजपुरवठा करण्यासाठी वापरले जात होते.
गोवा किनारपट्टीजवळ मासेमारी करत असलेल्या एका जहाजावरील व्यक्तीला अचानक गंभीर हृदयविकाराचा झटका आला. ही माहिती मिळताच, तटरक्षक दलाने तातडीने बचाव मोहीम राबवली.
गोवा उच्च न्यायालय बार असोसिएशनने आयोजित केलेल्या गोवा ॲडव्होकेट्स फुट्सल टूर्नामेंटमध्ये ॲड. योगेश नाडकर्णी आणि ॲड. दत्ताप्रसाद लावण्डे यांच्या मालकीच्या '१८ ज्युनिअर्स' संघाने नेत्रदीपक विजय मिळवला आहे. डॉन बॉस्को येथे झालेल्या या स्पर्धेला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हडफडे नाईट क्लब आग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या लुट्रा बंधूंना थायलंडमधून हद्दपार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. थायलंड पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आता हे दोन्ही आरोपी येत्या २४ ते ४८ तासांत भारतात परत येण्याची आणि गोवा पोलिसांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.
प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी भोम येथे प्रस्तावित असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्पाविरोधात कठोर भूमिका घेत आक्रमकता दाखवली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर हे रुंदीकरण पुढे गेले, तर विरोध करणारा पहिला माणूस मी असेल.
राम नगर-धारवाड रस्त्यावर एक भीषण अपघात झाला असून, त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. वेगात असलेली एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला.
कार चालवत असलेले पणजी, चिंबल येथील अब्दुल खादर (वय ५५) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर दोन सहप्रवाशी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.