Goa Winter Assembly Session  Dainik Gomantak
Live Updates

Goa Assembly Live: "आता प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट कॉन्स्टेबल्सना मिळणार बाईक्स"

Goa Winter Assembly Session News: जाणून घ्या गोव्यातील हिवाळी अधिवेशनाचे ठळक मुद्दे आणि राज्यातील महत्वाच्या बातम्या

गोमंतक ऑनलाईन टीम

"आता प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट कॉन्स्टेबल्सना मिळणार बाईक्स"

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, गृहखात्याची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि गस्त अधिक प्रभावी करण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल्सना बाईक्स पुरवल्या जाणार आहेत.

"नगरपालिका निवडणुका वेळेवर आणि पारदर्शक होणार"-मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील नगरपालिका निवडणुकांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मार्च २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर न टाकता त्या वेळेतच घेतल्या जातील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कोळशावरून सभागृहात गदारोळ

राज्यातील कोळसा हाताळणी बंद करण्याची मागणी करीत विरोधी आमदार सभापतींसमोरील हौदात. सभागृहात गदारोळ.

325 एमएलडी पाण्याचे प्रकल्प 6 महिन्यांत पूर्ण

गोव्याला सध्या ७०० एमएलडी पाण्याची गरज. त्यापैकी ६३० एमएलडी पाणी गोमंतकीयां‍ना मिळते. आणखी ३२५ एमएलडी पाणी देण्यासाठी प्रकल्पांचे काम सहा महिन्यांत होणार पूर्ण : सुभाष फळदेसाई, पाणीपुरवठा मंत्री

रोमियो लेन आगीबाबत शुक्रवारी स्पष्टीकरण

बर्च बाय रोमियो लेन क्लबमधील आगीवरून विरोधी आमदार पुन्हा आक्रमक. या प्रकरणावर शुक्रवारी स्पष्टीकरण देण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत य‍ांची हमी.

"1.5 लाख पगार घेणारे प्रशिक्षक पावसाळ्यात रिकामे नकोत"; क्रीडा मंत्र्यांचा 'इनडोअर स्टेडियम' प्लॅन

गोवा विधानसभा हिवाळी अधिवेशनादरम्यान, क्रीडा मंत्री रमेश तावडकर यांनी राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ वापराबद्दल मोठे विधान केले आहे. राज्यातील ११० हून अधिक क्रीडा प्रशिक्षकांचा वापर पावसाळ्याच्या काळातही प्रभावीपणे केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"मी आता शांत झालोय, देवाने मला तसा निरोप दिलाय"

गोवा विधानसभेत विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि कालच्या गोंधळावर भाष्य करताना मंत्री विश्वजीत राणे यांनी अत्यंत उपरोधिकपवित्रा घेतला. त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते दिगंबर कामत यांच्या 'दैवी संवादाच्या' प्रसिद्ध विधानाचा संदर्भ देत मिश्किल टोला लगावला.

"विरोधी आमदारांचे वर्तन बेशिस्त आणि अशोभनीय"- सभापती

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान जो गदारोळ केला, त्यावर सभापती डॉ. गणेश गावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी विरोधकांच्या या कृत्याचा 'अशिस्त' अशा शब्दांत निषेध केला आहे.

"राज्यपालांना त्यांचे घटनात्मक कर्तव्य करू दिलेच पाहिजे"

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणात जो व्यत्यय आणला, त्यावर कायदेतज्ज्ञ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती फर्डिनो रेबेलो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक! मायणा- कुडतरीत अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

Crime News: गोव्यात भरदिवसा थरार! पर्रा येथे प्रेमप्रकरणातून चाकू हल्ला; दोन तरुण जखमी

हवामानाचा लहरीपणा, आंबा-काजू पीक संकटात? बागायतदारांची धाकधूक वाढली

Margao Cuncolim Road: कुंकळ्ळी -चिंचोणे ग्रामस्थ उतरले रस्त्यावर! महामार्ग रुंदीकरणास विरोध; घरे, वस्ती नष्ट होण्याची भीती व्यक्त

Tuyem Hospital: 9 वर्षे झाली, तरीही हॉस्पिटल सुरू न होणे गंभीर! तुये इस्पितळ प्रश्नावर आंदोलन कायम; आंदोलक काढणार मशाल मिरवणूक

SCROLL FOR NEXT