न्यू चंदीगड येथे पंजाबविरुद्ध सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी एलिट डिव्हिजन सामन्यात गोव्याचा डावखुरा फलंदाज अभिनव तेजरानाने आक्रमक शतक झळकावले. तिसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यातील हे त्याचे दुसरे शतक होते. पर्वरी येथे चंदीगडविरुद्ध पदार्पणातच अभिनवने द्विशतक झळकावले होते.
रावण (सत्तरी) येथे आयोजित श्री महादेव मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमात आमदार डॉ. दिव्या राणे यांनी मंदिर हे गावाचं केंद्र असून, जिथे संस्कृती, एकता आणि श्रद्धा टिकून राहते तिथेच गावपण जिवंत राहते, असे सांगितले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक गावकऱ्याचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
मोबाईल आणि लॅपटॉप पळवलेल्या एका अल्पवयीनाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला. केवळ तासाभरात ही कारवाई फोंडा पोलिसांनी करून ज्यांचे मोबाईल पळवले होते, त्यांचे त्यांना परत केले. एकूण सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला.
फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक कृष्णा गावस तसेच बिंदेश म्हार्दोळकर व गोकुळदास दळवी यांनी ही कारवाई केली. त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
आम्हाला घाटी - घाटी म्हणून हिणवू नये, अशी विनंती कन्नड नेते मेटी यांनी केली आहे. यावेळी मेटी यांनी मनोज परब यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांची सर्व कुंडली लोकांकडे असल्याचा दावा केला तसेच, तुम्ही रात्री ग्लास घेऊन काहीतरी बोलता, असा खोचक टोला देखील लगावला.
कोकणीचे प्रमाणीकरण झाले नसल्याचे ते करण्याची घाई करु नये किंवा आग्रह सुद्धा धरु नये. मराठीचे प्रमाणीकरण होण्यास सुद्ध बराच वेळ लागलाय, असे नरेंद्र सावईकर म्हणाले.
रणजी ट्रॉफीच्या एलिट विभागात पंजाब विरोधात खेळताना गोव्याचा सलामीवीर सुयश प्रभूदेसाईने दणदणीत शतक ठोकले आहे. त्याने ४२ सामन्यात सात शतकं ठोकली आहेत. चंदीगड येथे हा सामना सुरु आहे.
वाळपईत घराला आग लागल्याची घटना सकाळी घडली. भुईपाल येथील भाईकडे प्राथमिक सरकारी शाळेजवळ ही घटना घडली. अग्निशमन दलाने अगीवर नियंत्रण मिळवले खरे पण, या आगीत इलेक्ट्रीक बाईक, वॉशिंग मशीन आणि शेड जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे. गावकर यांनी सावर्डे मतदारसंघातील प्रमुख प्रकल्पासंबधित चर्चा केली. यात रस्ते, महाविद्यालय आणि NH-748 महामार्गाचे चौपदरीकरण अशा मुद्दे त्यांनी मांडले. गडकरांनी गावकरांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.