Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa News: पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय; वाचा गोव्यातील ठळक बातम्या

Goa Latest News Update: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन सोहळा, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गुन्हे, राजकारण यासह क्रीडा, कला-संस्कृती क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

प्रमोद सावंत, गोविंद गावडे राजीनामा द्या; Cash For Job Scam वरुन काँग्रेस आक्रमक

राज्यातील 'कॅश फॉर जॉब' प्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालत नाही, सध्या पोलिसांवर राजकारण्यांचा दबाव असून हे प्रकरण विशेष तपास पथक एसआयटीकडे द्यावे, अशी मागणी करीत गोवा युथ काँग्रेसने म्हार्दोळ पोलिस स्थानकासमोर आज शुक्रवारी निदर्शने केली.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सावंत आणि कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी करून त्यांच्या प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला.

नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

पारोडा-केपे येथे घरात महिलेचा मृतदेह आढळला असून, महिलेचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा केला जात आहे.

सलग तिसऱ्या दिवशी पिळगाव शेतकऱ्यांचे आंदोलन!

पिळगावच्या शेतकऱ्यांचे 'रस्ता बंद'आंदोलन चालूच. 'वेदांता'ची खनिज वाहतूक सलग तिसऱ्या दिवशीही बंद. वेदांताच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष.

पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस (२४ आणि २४ नोव्हेंबर) मर्यादीत पाणी पुरवठा केला जाणार आहे. सांगोल्डा जंक्शन येथे दुरुस्तीच्या कामानिमित्त बार्देशमध्ये मर्यादीत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील १०० घरांवर हातोडा पडणार आहे. कॅनालच्या आजुबाजूला असलेल्या अवैध घरे हटवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत, अशी माहिती नगरसेवक उद्देश भिकू नाईक देसाई यांनी दिली आहे.

Cash For Job Scam: काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

कॅश फॉर जॉब प्रकरण एसआयटीकडे सुपुर्द करण्याची मागणी करत, कांग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व मंत्री गोविद गावडे यांचा पुतळा जाळून निषेध, तसेच दोघांनीही राजीनामा देण्याची मागणी.

saint francis xavier exposition; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

२१ नोव्हेंबरपासून गोव्यात सुरु झालेल्या संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन सोहळ्याला आलेमाव फॅमिलीनी भेट दिली. आलेमाव फॅमिलीने गोंयच्या सायबाचे दर्शन घेतले. यावेळी माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव आणि वालांका आलेमाव उपस्थित होते.

सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

गोव्यातील सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस सतर्क झाले असून, १५२ मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. राज्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मोबाईल नंबर पोलिसांनी ब्लॉक केलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT