FDA Raid At Mapusa KTC Bus Stand Dainik Gomantak
Live Updates

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

Goa News Update: गोव्यात दिवसभर क्राईम, राजकारण, पर्यटन, क्रीडा, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडी.

Pramod Yadav

खांडेपार येथील गटारात पडून गाय जखमी

खांडेपार येथील जुन्या पुलाजवळील उघड्या गटारात गाय पडून जखमी झाली आहे. नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने गाईला बाहेर काढले.

म्हापशात भेसळयुक्त २०० किलो बडीशेप जप्त

नवीन केटीसी बसस्थानकावर आज अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) २०० किलो भेसळयुक्त बडीशेप जप्त करण्यात आली. सध्या एफडीएकडून धडक कारवाई राज्यभर सुरू आहे.

हा भेसळयुक्त मुद्देमाल पुण्याहून आंतरराज्य बसमधून आणण्यात आला होता. ही बडीशेपचा पुरवठा स्थानिक मसाल्यांच्या दुकानात केला जाणार होता. याचे नमुने एफडीएने घेतले आहेत. एक किलोची एकूण २०० पाकिटे जप्त केली असून हा मुद्देमाल ७४ हजार रुपये इतका आहे. या बडीशेपला प्रक्रिया केलेला रंग चढविण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईज संपावर

दक्षिण गोव्यातील सुमारे 100 स्विगी डिलिव्हरी बॉईजने शुक्रवारी संप पुकारला आहे. किमान वेतन व बाईकचे किलो मीटरचे भाडे वाढवा, अशी त्यांची मागणी आहे.

मायलेकीवर लैंगिक अत्याचार, असोल्डा येथील एकास अटक

एका महिलेचे आणि तिच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि धमकी दिल्याप्रकरणी झेवियर मोराइस (55, असोल्डा, कुडचडे) याला केपे पोलिसांकडून अटक. हा गुन्हा एप्रिल 2019 - सप्टेंबर 2024 दरम्यान घडला.

इडीसीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री, इतर संचालकांचीही नेमणूक!

इडीसीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत तर उपाध्यक्षपदी संजय सातार्डेकर.ललिता अफोन्सो,जयराम खोलकर,चेतना शेट्टी,ॲड.दिपक तिळवे,ॲड.यतीश नायक, मार्क मेंडीस यांची संचालकपदी नेमणूक.

Goa Accident: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

हणजुणे येथे थार गाडीची दुचाकीला धडक. या अपघातात दुचाकीस्वार भोवेश सावंत, पत्नी व त्याचा 2 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी असून त्यांना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हापसा पोलिसांकडून थार चालक चौकशीसाठी ताब्यात.

बुधवारपर्यंत तोडगा न काढल्यास स्थानिक आमदारांच्या दारात ओतणार कचरा

काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली कुडचडेच्या रहिवाशांच्या शिष्टमंडळाने खाजगी मालमत्तेवर बेकायदेशीर कचरा टाकण्याच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी कचरा व्यवस्थापन मंत्री यांची भेट घेतली.

बुधवारपर्यंत या प्रश्नावर तोडगा न काडल्यास कठोर कारवाई करून आणि स्थानिक आमदारांच्या दारात कचरा टाकू कशी चेतावणी अमित पाटकर यांनी दिली

पिराचीकोंड-डिचोली येथील बेकायदेशीर झोपडपट्टी हटविण्यास सुरुवात, परिसरात तणाव

बेकायदेशीर झोपडपट्टी जमीनदोस्त करण्याच्या आदेशामुळे डिचोली शहरातील पिराचीकोंड येथे खळबळ. जेसीबीसह प्रशासकीय यंत्रणा दाखल. बेकायदा झोपडपट्टी हटविण्यास सुरुवात. परिसरात तणाव.

पुण्यातून गोव्यात आणलेली बनावट बडीशेप जप्त

पुणे येथून आंतरराज्य बसमधून आणलेला प्रक्रिया केलेली 200 किलो बनावट बडीशेप एफडीएकडून जप्त. म्हापसा नवीन बस स्थानकावर कारवाई.

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक

सहा लाख 80 हजार किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आशा अजय लाक्रा (रा. छत्तीसगड) या महिलेला अग्निवाडो, गिरी येथून अटक.गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (19 सप्टेंबर) ही धडक कारवाई केली. भाड्याच्या खोलीत महिला वास्तव्यास होती. तिच्याजवळ 118.537 वजनाचे अमली पदार्थ आढळून आला आहे.

पणजीत मांडवी पुलावर पुन्हा अपघात, तिघेजण जखमी

मांडवी पुलावर पणजीतून म्हापशाच्या दिशेने जाणाऱ्या कारने ओव्हरटेक करताना पुढून येणाऱ्या दोन दुचाकींना दिली धडक. दोन दुचाकींवरील तिघेजण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कार चालक दारुच्या नशेत असल्याचा उपस्थितांचा दावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT