FIR Dainik Gomantak
Live Updates

Goa Today's News Live: कॅश फॉर जॉब प्रकरण; श्रुती प्रभूगांवकरला दोन दिवसांची पोलिस कोठडी

Goa Latest Breaking News 16 November 2024: कॅश फॉर जॉब स्कॅम, इफ्फी आणि संत फ्रान्सिस झेवियर शव दर्शन सोहळ्याची तयारी यासह राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा, कला- संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्या.

Pramod Yadav

कॅश फॉर जॉब प्रकरण; श्रुती प्रभूगांवकरला दोन दिवसांची पोलिस कोठडी

कॅश फॉर जॉब प्रकरणातील श्रुती प्रभूगांवरकरला फोंडा कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नोकरी घोटाळा प्रकरण; उमा पाटील विरोधात आणखी एक गुन्हा नोंद

कॅश फॉर जॉब प्रकरणात संशयित उमा पाटील विरोधात कोलवाळ पोलिस स्थानकात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. रेवोडा येथील व्यक्तीला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उमा पाटीलने व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दिले होते.

Mapusa Fire: म्हापशात कल्पना कॅफेला आग, दहा हजारांचे नुकसान

म्हापशातील कल्पना कॅफेला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कॅफेच्या किचनमध्ये अचनाक आग पेटली. या कोणीही जखमी झाले नाही पण, कॅफेचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलीय.

गोवा - बेळगाव महामार्गावर वाहतूक ठप्प, खराब रस्त्यामुळे वाहन पडले बंद

गोवा - बेळगाव महामार्गावर खराब रस्त्यामुळे अवजड वाहन बंद पडले आहे. यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली आहे. अद्याप घटनास्थळी कोणी हजर झाले नसून, परिस्थिती जैसे थे आहे. वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

रुमडामळ दवर्लीत पंच विनायक वळवईकर यांना जमावाकडून मारहाण

रुमडामळ दवर्लीत पंच विनायक वळवईकर यांना जमावाकडून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वळवईकर आके पॉवर हाऊस येथून जात असताना अज्ञात टोळक्याने त्यांना मारहाण केली. यात वळवईकर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी दक्षिण जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.

100 लिटर गोवा बनावटीची दारु जप्त; कारवारमध्ये तस्करीचा प्रयत्न लावली उधळून

कारवारमध्ये मद्य तस्करीचा प्रयत्न अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावला. जप्तीच्या कारवाईत अधिकाऱ्यांनी ९८ लिटर मद्यसाठी जप्त केला आहे. अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी शोधमोहिम राबवली, दोन दुचाकीच्या मदतीने तस्करी होणारे मद्य जप्त करण्यात आले आहे.

Porvorim Traffic Jam: पर्वरीत मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

पर्वरीत मोठी वाहतूक कोंडी झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने तसेच, येथील उड्डाण पुलाचे काम सुरु झाल्याने वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manohar Parrikar Yuva Scientist Award 2024: कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या डॉ. जॉली यांना मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार जाहीर

Goa Fraud: मेरशीतील पॉच बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला लाखोंचा गंडा; जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!

ओसामाने साजिदला फसवलं! Airport कंत्राटाचे आमिष देऊन घेतल्या गाड्या, 55 लाखांच्या मर्सिडीजमधून फिरत राहिला मुंबई - गोवा

Saint Francis Xavier Exposition 2024: संत फ्रान्सिस झेवियर यांचा शवदर्शन सोहळा लाईव्ह कुठे पाहता येणार? पाहा डिटेल्स

Goa Cricket: धुवांधार स्नेहल! कारकिर्दीत चौथ्यांदा पाचशेहून जास्त धावा; गोव्याच्या फलंदाजीचा ठरतोय ‘आधार’

SCROLL FOR NEXT