गुरुवारी डिचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) एका अल्पवयीन मुलाला मृतावस्थेत आणण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाला असावा, म्हणजेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा गुदमरल्यामुळे झाला असावा.
गेल्या काही दिवसांत, दक्षिण गोवा पोलिसांनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले ६७ मोबाईल फोन जप्त केले आहेत. एसपी साउथ, टीका सिंग वर्मा यांनी लोकांना त्यांच्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनबद्दल सीईआयआर पोर्टलवर तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून पोलिसांना त्यांचा शोध लवकर घेता येईल. आमच्या सागर पोलिस पथकाने ड्रग्ज विरोधी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत, आम्ही अनेक छापे टाकले आहेत आणि सुमारे १५ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत; एसपी साउथ.
फातोर्डा येथील माडेल येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कॅशियरने ४५,००० रुपये रोख आणि मोबाईल फोन घेऊन पळ काढल्याचा आरोप आहे.
पर्वत-पारोडा येथील श्री चंद्रेश्वर-भूतनाथ संस्थानात सोमवार, २० ऑक्टाेबर रोजी पालखी उत्सव सायंकाळी ५ वाजता साजरा केला जाणार आहे. तरी सर्व भक्तगणांनी याची नोंद घ्यावी, असे श्री संस्थान कमिटीतर्फे कळविण्यात आले आहे. सोमवार, २० रोजी दिवाळी असल्याकारणाने हा बदल करण्यात आला आहे.
सुपर स्टार स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक क्लबतर्फे दिवाळी उत्सवानिमित्त शनिवारी (ता. २५) आगरवाडा चोपडे मर्यादित आकाश कंदील स्पर्धा जे. ए. चोपडेकर स्मृती सरकारी हायस्कूलच्या पटांगणावर ही स्पर्धा सायंकाळी ६.३० वाजता घेण्यात येणार आहे. यावेळी दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात येईल. नाट्यारंभ स्कूल ऑफ आर्टस या संस्थेचे विद्यार्थी नृत्ये तर कासारवर्णे येथील श्री सातेरी महिला कला संघाचे कलाकार समई नृत्य सादर करतील. दोन आमंत्रित पथके गरबा रास सादर करणार आहेत.
रेल्वेच्या धडकेने एक अज्ञात व्यक्ती ठार झाला. करमळी रेल्वे स्टेशननजीक ही घटना घडली. मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असून, अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी ही घटना नोंदवून घेतली आहे. मृतदेह गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे. उपनिरीक्षक व्ही. वस्त पुढील तपास करीत आहेत.
शिरोडा येथील कलासागर सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, १९ रोजी शिरोडा गावापुरती मर्यादित आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली आहे. येथील बँक ऑफ इंडियासमोर सायंकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. माहितीसाठी नीलेश शिरोडकर यांच्याशी संपर्क साधावा.
आके येथे एका फ्लॅटला मंगळवारी रात्री आग लागून एक लाख रुपयांची हानी झाली. मडगाव अग्निशमन दलाने नंतर घटनास्थळी जाऊन आग विझविताना वीस लाखांची मालमत्ता वाचविली. समीर देविदास यांच्या मालकीचा हा फ्लॅट आकार हॅबिटेट या इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे. रात्री पावणे बाराच्या दरम्यान आगीची वरील घटना घडली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला.
दहा महिन्यांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणाचा मायणा कुडतरी पोलिसांनी छडा लावताना दोघांना अटक केली. अंजारुल हक्क (२०, बिहार) व विमल सिंग (२९, दिल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत. १८ जानेवारी रोजी संशयितांनी नेक्सा शोरूममध्ये चोरी करून तिजोरी फोडून ९० हजार पळविले होते. या घटनेनंतर ते फरार झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.