आयटकच्या राज्य समितीने फेरीबोटींचे संचालन खासगी कंत्राटदारांकडे सोपवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. संघटनेने म्हटले आहे की, “राजस्व बचतीच्या नावाखाली” केलेले हे खासगीकरण म्हणजे “फक्त दिखावा” असून, यामुळे नदी परिवहन विभागातील कायमस्वरूपी ताफा कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेवर आणि सेवा अटींवर गंभीर परिणाम होणार आहे.
ग्रांद पुलवाडो कोलवा येथे अपघातात दोघेजण जखमी झाले. मुशर्रफ बोझकर व गनी फर्नांडिस अशी जखमींची नावे आहेत. या अपघात प्रकरणी कोलवा पोलिसांनी मुशर्रफ बोझकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हवालदार कमलाकर वेळीप पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मुशर्रफ हा आपल्या दुचाकीवरून भरधाव वेगाने खारेबांद येथून बाणावलीच्या दिशेने जात असताना, त्याने समोरून जाणाऱ्या अन्य एका दुचाकीला मागून धडक दिली. त्यातत दोघेजण जखमी झाले. मुशर्रफ बोझकर व गनी फर्नांडिस अशी जखमींची नावे आहेत. या अपघात प्रकरणी कोलवा पोलिसांनी मुशर्रफ बोझकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हवालदार कमलाकर वेळीप पुढील तपास करीत आहेत.
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून वास्को येथील रहिवाशाची एका महिलेने १.३३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वास्को येथील अमृत गोविंद साखळकर यांनी आरोप केला आहे, की भूष्रा खानम झारा खानम या महिलेने त्यांची १.३३ कोटी रुपयांची फसवणूक केली. तक्रारीत म्हटले आहे, की खानम हिने या पैशांचा वापर वैयक्तिक कारणांसाठी केला आणि माहिती मागितल्यावर बलात्काराचा आरोप करण्याची धमकी दिली. मार्च ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत खानम हिने साखळकर यांना शेती आणि हॉटेल प्रकल्पांमध्ये भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
२०१८ पासून असुरक्षित व धोकादायक घोषित करण्यात आलेली मडगावमधील काबेका द कालकोंड ही इमारत अखेर पाडण्याच्या कामाला सुरवात झाली. गुरुवारी या इमारतीतील सदनिकांतील तसेच तळमजल्यावरील धंदा आस्थापनांतील साहित्य हटवण्याचे काम सुरू झाले. इमारत पूर्ण खाली केल्यावर ती पूर्णपणे पाडण्यात येईल असे कळते.
पारोडा पंचायतीच्या मुळे या गावातील सर्व्हे क्र. १५६/० या जागेत बेकायदेशीर डोंगरकापणी सुरू असल्याची तक्रार केपेच्या नगरनियोजन विभागाला दिल्यानंतर या विभागाच्या भरारी पथकाने त्वरित हे काम बंद पाडले. यासंदर्भात दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी वेल्टन टेलीस यांनी काम बंदचा आदेश बुधवार, २२ ऑक्टाेबर रोजी जारी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.