सुदिन ढवळीकर गोव्यातील लोकांसाठी नरकासुरासारखे वागत आहेत, वीज दर वाढवून आपल्याला अंधारात ढकलत आहेत. सरकारी आणि व्यावसायिक थकबाकीदारांकडून २४० कोटी रुपये वसूल करण्याऐवजी, ते सामान्य गोव्यातील लोकांना त्रास देण्याचा पर्याय निवडतात: सिद्धेश भगत
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते सतीश शाह यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
गोव्यातील सर्वात मोठ्या कोकेन जप्ती प्रकरणासंदर्भात गोव्यातील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभियोजन तक्रार दाखल केली आहे. लाओसमधून ४.३२५ किलो कोकेनच्या तस्करीशी संबंधित असलेल्या दोन परदेशी नागरिकांसह सात जणांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे.
राज्याला जहाजोद्योगाचे केंद्र बनवण्यासाठी गोवा सागरी मंडळ स्थापन करावे अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाच्या राज्य शाखेने केली आहे. जहाजबांधणी आणि संबंधित सेवांसाठी ''एक खिडकी मान्यता देणारी एक समर्पित सागरी संस्था तयार करावी. जहाज डिझाइन, मॉड्युलर कन्स्ट्रक्शन, ऑटोमेशन आणि ग्रीन शिप इनोव्हेशन यांसारख्या कार्यक्रमांसाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने एक सागरी तंत्रज्ञान आणि डिझाईन संस्था स्थापन करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पाजवाडा येथे भर रस्त्यावर इंधन सांडल्याने काही वेळ वाहतुकीस व्यत्यय आला. मात्र डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धावपळ करून उपाययोजना केल्याने धोका टळला तसेच वाहतूकही सुरळीत झाली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थिती नियंत्रणात आणली. वेळीच उपाययोजना केल्याने कोणतीही वाईट घटना घडली नाही.
ओला या इलेक्ट्रीक स्कुटरच्या गोव्यातील तीनही सर्विस स्टेशनवर सुमारे २ हजार स्कुटर्स विनादुरुस्त पडून आहेत. या स्कुटरच्या दुरूस्तीसंदर्भात विचारल्यास सर्विस स्टेशनवरील कर्मचारी उर्मटपणे उडवाउडवीची उत्तरे देतात. गोव्यातील या नादुरुस्त स्कुटर्सची दुरूस्ती झाल्याशिवाय गोव्यात ओलाची विक्री बंद करावी. ओला स्कुटरमालकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.
हिट अँड रन'' अपघात प्रकरणी डिचोली पोलिसांनी कारचालक सूरज पत्री (बेळगावी), प्रकाश संभोजी आणि आलमप्रभू गुंडाप्पानवर यांना ताब्यात घेतले आहे. कारही जप्त केली आहे. हा अपघात रविवारी सर्वण येथील एमआरएफ टायर शोरूमजवळ घडला होता.
म्हापसा: घाटेश्वरनगर, खोर्ली येथे विनापरवाना कार्यरत चार गाळेवजा दुकाने पालिकेने सील केली. मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या आदेशानुसार कनिष्ठ अभियंता सुभा आमोणकर, मंथन कासकर, निरीक्षक नरसिंह राटवळ व कर्मचारी वामन पवार यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. दरम्यान, नगरसेवक विराज फडके यांनी आपल्याच प्रभागातील दुकानांना लक्ष्य बनवण्याच्या प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित केला.
गोव्याच्या सीमावर्ती कर्नाटकातील खानापूर तालुक्यात आलेल्या १० जंगली हत्तींची शेती-बागायतींची नासधूस करणे सुरू केले आहे. कर्नाटक वन खात्याचे पथक दाखल झाले असले तरी ते हत्तींना अटकाव करू शकलेले नाही. हे हत्ती गोव्यात येतील या शक्यतेने गोव्याच्या वन खात्याने सीमावर्ती भागातील जंगल गस्त वाढवली आहे.
मास्केनेट्टी, भुरणकी, करिकट्टी, गस्टोळी आदी गावांमध्ये हत्तींचा कळप शेतीची नासधूस करत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. मास्केननहट्टी गावात आज सायंकाळी हत्ती दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. हत्तींचे मार्गक्रमण पश्चिमेकडे होत असल्याने ते गोव्यात येण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.