goa breaking news  Dainik Gomantak
Live Updates

Goa Live Updates: आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी निवेदने देण्याचा कोडार ग्रामस्थच्या बैठकीत निर्णय

Goa Marathi Latest News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण,क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

Sameer Panditrao

आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी निवेदने देण्याचा कोडार ग्रामस्थच्या बैठकीत निर्णय

मुख्यमंत्र्याची भेट घेऊन चर्चा करणे, खास ग्रामसभेची मागणी, कोमुनीदाद प्रशासकाला भागधारक, बागायतदार, ग्रामस्थ व अन्य जणांकडून आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी निवेदने देण्याचा कोडार ग्रामस्थच्या बैठकीत निर्णय

केरळ संस्कृतीचे घडणार दर्शन घडविणाऱ्या 'ओणम' उत्सवाचा उत्साह

केरळ संस्कृतीचे घडणार दर्शन घडविणाऱ्या 'ओणम' उत्सवाचा उत्साह. केरळचे राज्यपाल राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या उपस्थितीत डिचोलीत 'ओणम'ला उत्साहात प्रारंभ

हातुर्ली-मये येथून 70 वर्षीय वृद्धा बेपत्ता

हातुर्ली-मये येथून 70 वर्षीय वृद्धा बेपत्ता. गेल्या बुधवारी आठवडी बाजारासाठी डिचोलीत गेलेल्या चंद्रिका शिरोडकर या वृद्ध महिला घरी परतल्याच नाही. पोलिसात तक्रार

व्हाळशी-डिचोली येथे बगलमार्ग जंक्शनवर औषधवाहू ट्रक कलंडला

व्हाळशी-डिचोली येथे बगलमार्ग जंक्शनवर औषधवाहू ट्रक कलंडला. शनिवारी मध्यरात्रीची घटना. ट्रकचालक सुरक्षित. ट्रकचालकाचे नियंत्रण गेल्याने अपघात

भरकटलेला ओंकार हत्ती गोव्यात दाखल

भरकटलेला ओंकार हत्ती गोव्यात दाखल. मोपा लगतच्या जंगल भागात वावर. सिंधुदुर्ग वन‌ खात्याची माहिती.

Goa Beach: सुट्टीला समुद्रकिनारी २४ तास जीवरक्षक

पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूभीवर विकएंड व सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांनी २४ तास किनाऱ्यावर टेहाळणी करावी, अशी सूचना दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी केली आहे. ‘दृष्टी’ जीवरक्षकचे प्रतिनिधी, उपअधीक्षक  सिद्धार्थ  शिरोडकर, कोलवा, काणकोण, वास्को व मुरगाव'' पोलिस ठाण्याचे निरीक्षक यावेळी उपस्थित होते.  

बुडून मृत्यू व काही संशयास्पद बाबी आढलळ्यास त्वरित पोलिस ठाणे व कन्ट्रोल रूमशी संपर्क साधावा, प्रत्येक पोलिस ठाण्यात एक अधिकारी जीवरक्षक सर्वेक्षक व अन्य कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवण्यासाठी तैनात केला जाईल, असे वर्मा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

Suryakumar Yadav: 21 कोटींचं आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन...'सूर्या दादा'ची Net Worth ऐकून चक्रावून जाल

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

SCROLL FOR NEXT